भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची सोमवारी ( २४ ऑक्टोंबर ) ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली. सुनक हे चार वर्षांतले पाचवे पंतप्रधान आणि माजी अर्थमंत्री आहेत. पंतप्रधानपदासाठी सत्ताधारी हुजूर पक्षात पेनी मॉरडाँट आणि ऋषी सुनक यांच्यात शर्यत होती. मात्र, १०० खासदारांनी सुनक यांना पाठिंबा दिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, पंतप्रधानपदाचे ध्येय गाठण्यासाठी सासरे इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांनी प्रोत्साहित केल्याचं ऋषी सुनक यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“नारायण मूर्ती हे यशस्वी उद्योजक आहेत. त्यांनी हजारो लोकांना रोजगार दिला आहे. त्यामुळे संपूर्ण देशाची कल्पना बदलली आहे. याद्वारे आपण प्रभाव पाडू शकतो, असे मला वाटलं होतं. पण, नारायण मूर्ती यांनी सांगितलं, तुम्हाला प्रभाव पाडायचा असेल, व्यवसायाऐवजी राजकारण केलं पाहिजे. ते नेहमीच माझ्या मागे उभे राहून प्रोत्साहन देतं होते. त्यामुळेच आज पंतप्रधानपदापर्यंत मी पोहचू शकलो, असे सुनक म्हणाले.

हेही वाचा : मोदी सरकारची २५४ कोटींची कमाई २६ दिवसात आणि ती ही रद्दी, भंगार विकून; इतकी जागा रिकामी झाली की…

ब्रिटनबद्दल बोलताना ऋषी सुनक यांनी म्हटलं, “देशाच्या विकासाची गती वाढवायची असेल, तर तुमची अर्थव्यवस्था बळकट असणे आवश्यक आहे. देशात नवीन कंपन्या आणि गुंतवणूक झाली पाहिजे. तसेच, व्हिसा सुविधा सुलभ असेल तर पर्यटकांना आपण आकर्षित करु शकतो. जर, या गोष्टींना आपण चालना दिली, तर अर्थव्यवस्थेला गती कशी द्यायची याची मला माहिती आहे,” असेही ऋषी सुनक यांनी सांगितलं. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan murthy told me i could have more impact word throgh politics than business say rishi sunak ssa