स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांचा मुलगा नारायण साई याला सोमवारी गुजरात उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला. बलात्काराच्या आरोपांमुळे नारायण साई तुरुंगात आहे. आईवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्यामुळे नारायण साई याने जामीन मंजूर करण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती. त्यावर न्यायमूर्ती व्ही. एम. पांचोली यांनी तीन आठवड्यांच्या जामीन मंजूर केला. जामीनाच्या कालावधीत नारायण साई याच्यावर पोलीसांची देखरेख असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. डिसेंबर २०१३ पासून नारायण साई सुरतमधील तुरुंगात कैदेत आहे. आसाराम बापूही लैंगिक अत्याचाराच्या आरोपांखाली जोधपूरमधील तुरुंगात कैदेत आहेत. बलात्काराच्या खटल्यातील साक्षीदारांवर हल्ले करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. त्या पार्श्वभूमीवर नारायण साई याला जामीन मंजूर झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा