बलात्काराच्या आरोपावरून अटकेत असलेला आणि स्वयंघोषित गुरू आसाराम बापू यांचा पुत्र नारायण साई याला कारागृहात ‘व्हीआयपी’ सेवा हवी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, नारायण साईला तब्बल ५८ दिवसांनंतर पंजाब सीमेवर अटक करण्यात यश आले. सध्या कारागृहात तो शिक्षा भोगत आहे. कारागृहामध्ये त्याने चांगल्या दर्जाचे अन्न व पाण्यासाठी ‘मिनरल वॉटर’च्या बाटलीची मागणी केली आहे. कारागृहात देण्यात येणारे जेवण योग्य दर्जाचे नसल्याचे नारायण साईचे म्हणणे आहे. यावर पोलिसांनी मात्र कैद्यांना देत असलेले अन्न हे चांगल्या दर्जाचे असल्याचा दावा केला आहे. इतर कैद्यांप्रमाणेच त्यालाही तेच अन्न देत आहोत. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा