जागतिक बिकट अर्थव्यवस्थेचा फटका ढासळत्या वित्तीय निष्कर्षांच्या रुपात सहन करणाऱ्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीला तिच्या मुख्य संस्थापकांची पुन्हा एकदा निकड भासू लागली आहे. परिणामी इन्फोसिसच्या ताफ्यात तिचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती दाखल होत आहेत; मात्र यंदा त्यांच्या दुसऱ्या ‘टर्म’मध्ये त्यांचे पुत्र रोहन त्यांचे मुख्य सहयोगी असतील.
इन्फोसिसचे सध्याचे अध्यक्ष व आघाडीचे बँकर के. व्ही. कामत यांनी स्वत:हून मूर्ती यांना कंपनीत पाचारण केले असून मूर्ती यांनीही नवी जबाबदारी आव्हानात्मक असल्याचे म्हटले आहे. अनपेक्षित मूर्ती यांच्या इन्फोसिस पुनप्र्रवेशासह सध्याच्या महत्त्वाच्या पदांमध्येही मोठय़ा प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. वयाच्या ६० व्या वर्षांपर्यंत मुख्य पदावर राहिलेले मूर्ती यांच्या नव्या नेतृत्वाखाली इन्फोसिस पुन्हा तिचा लौकिक प्राप्त करणार का, असा प्रश्न आहे.
एन. आर. नारायणमूर्ती हे इन्फोसिसचे कार्यकारी अध्यक्ष बनले आहेत. तर पुत्र रोहन हे मूर्ती यांचे कार्यकारी सहयोगी म्हणून यापुढे काम पाहतील. कंपनीचे सध्याचे अध्यक्ष के. व्ही. कामथ हे दैनंदिन कामकाजापासून फारकत घेत असून यापुढे ते केवळ स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत असतील. सध्या कार्यकारी उपाध्यक्ष असलेले एस. गोपालकृष्णन हेोता कार्यकारी उपाध्यक्ष असतील. तर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची एस. डी. शिबुलाल यांच्याकडील जबाबदारी नव्या फेरबदलातही कायम ठेवण्यात आली आहे.
१९८१ मध्ये पुण्यात २५० डॉलरच्या पुंजीद्वारे मुहूर्तमेढ रोवताना मूर्ती यांच्या खांद्याला खांदा देणाऱ्या सहा अभियंते मित्र असलेल्यांपैकी गोपालकृष्णन आणि शिबुलाल यांनी नव्या फेरबदलात सहभागी होताना वार्षिक केवळ एक रुपया मानधन घेण्याचे वचन दिले आहे. पुत्र डॉ. रोहन यांनीही हाच कित्ता गिरविण्याचे निश्चित केले आहे. नव्या नियुक्त्या पाच वर्षांंसाठी असतील. ७०० कोटी डॉलरच्या इन्फोसिसच्या बंगळुरू येथील मुख्यालयात शनिवारी मूर्तीद्वयींच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले. याला आता येत्या १५ जून रोजी होणाऱ्या भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब होईल. तत्पूर्वी, शनिवारपासूनच, १ जूनपासून मूर्ती पिता-पुत्रांच्या नव्या पदाची अंमलबजावणी अस्तित्वात आली आहे.

Story img Loader