मुलाला कार्यकारी सहाय्यक पद
आयटी क्षेत्रातील प्रसिद्ध इन्फोसिस कंपनीचे संस्थापक एन.आर.नारायण मुर्ती पुन्हा एकदा कंपनीचे कार्यकारी संचालक(एक्झिक्युटिव्ह चेअरमन) म्हणून कारभार पाहणार आहेत. नारायण मुर्तींनी आज शनिवार पासून कंपनीचा कार्यकारी संचालक म्हणून पदभार स्विकारला. ते पुढील पाच वर्षांसाठी कार्यकारी संचालक म्हणून कंपनीचा कारभार पाहतील.
नारायण मुर्ती यांनी २०११ मध्ये इन्फोसिसच्या चेअरमन पदावरुन राजीनामा दिला होता. त्यानंतर के.व्ही.कामत यांनी चेअरमन पद सांभाळले. आज कामत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व पुन्हा नारायण मुर्ती यांची चेअरमन पदावर निवड करण्यात आली. मुख्य म्हणजे, या पदासाठी नारायण मुर्ती यांनी वर्षाला अवघे एक रुपया मानधन घेतले आहे. के.व्ही.कामत आता कंपनीचे लीड स्वतंत्र संचालक म्हणून कारभार पाहणार आहेत. तसेच नारायण मुर्तींचा कार्यकारी सहाय्यक म्हणून मुर्ती यांचा मुलगा रोहन याची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Story img Loader