नरेंद्र मोदी यांनी रविवारी (९ जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर एकूण ७१ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी मोदींसह ६१ खासदार हे भाजपाचे आहेत. तर मित्रपक्षांमधील १० खासदारांना मंत्रिपद मिळालं आहे. मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात एकूण ३० कॅबिनेट मंत्री, ५ स्वतंत्र पदभार असलेले राज्यमंत्री तर ३६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत नव्या मंत्रिमंडळातील ७१ मंत्र्यांमध्ये खातेवाटप करण्यात आलं. दरम्यान, मोदींच्या मंत्रिमंडळात अनेक जुने चेहरे कायम आहेत. मोदींच्या पहिल्या आणि दुसऱ्या मंत्रिमंडळात असलेल्या काही मंत्र्यांकडील जुनी खाती तिसऱ्या मंत्रिमंडळातही कायम ठेवण्यात आली आहे.

अमित शाह (गृह), राजनाथ सिंह (संरक्षण), नितीन गडकरी (रस्ते वाहतूक आणि महामार्ग), निर्मला सीतारामण (अर्थ), एस. जयशंकर (परराष्ट्र व्यवहार) यांच्याकडील जुनी खाती तशीच ठेवण्यात आली आहेत. यासह अमित शाह यांच्याकडील सहकारमंत्रिपदही कायम आहे. अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वेसह माहिती आणि प्रक्षेपण विभाग सोपवण्यात आला आहे. पीयूष गोयल यांच्याकडील वाणिज्य आणि उद्योगमंत्रीपद कायम ठेवण्यात आलं आहे. तसेच शिक्षणंत्रीपदी पुन्हा एकदा धर्मेंद्र प्रधान यांचीच निवड करण्यात आली आहे.सर्वानंद सोनोवाल यांच्याकडील बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रिपद कायम ठेवण्यात आलं आहे. तर हरदीपसिंग पुरी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री म्हणून काम पाहतील. पुरी यांच्याकडे हेच मंत्रिपद यापूर्वी देखील होतं.

Two months ago Thane Municipal Corporation requested bmc for 50 million liters of water
ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षा, मुंबई महापालिकेकडून वाढीव पाण्याबाबत अद्याप निर्णय नाही
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
Pune Water Supply, Water Resources Department,
पुण्याच्या पाण्याचे नियंत्रण जाणार जलसंपदा विभागाच्या ताब्यात? नक्की काय आहे कारण !
house damaged by falling tree branch in goregaon
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याकडी जुनी खाती कायम ठेवली आहेत. मोदींकडे कार्मिक, तक्रार व निवृत्ती वेतन खात्याची जबाबदारी आहे. हे मंत्रालय म्हणजे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमधील समन्वय, त्यांच्या तक्रारी व कामासंदर्भातील इतर बाबींच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असणारी यंत्रणा आहे. यात विविध पदांसाठी उमेदवारांची निवड, त्यांचं प्रशिक्षण, नोकरीअंतर्गत वृद्धी, कर्मचारी कल्याण अशा महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. यासह मोदींकडे अंतराळ विभाग आणि अणुऊर्जा विभागाचाही कार्यभार आहे.

हे ही वाचा >> लोकसभेच्या निकालानंतर ठाकरे-भाजपाचं मनोमिलन? चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे तर्कवितर्कांना उधाण

कॅबिनेट मंत्री व त्यांची खाती…

  • राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
  • अमित शाह – गृहमंत्री; सहकार मंत्री
  • नितीन गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
  • जगत प्रकाश नड्डा – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री; रसायने आणि खते मंत्री
  • शिवराज सिंह चौहान – कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री
  • निर्मला सीतारामण – अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री
  • डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर – परराष्ट्र व्यवहार मंत्री
  • मनोहर लाल खट्टर – गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि उर्जा मंत्री.
  • एच. डी. कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री आणि पोलाद मंत्री
  • पीयूष गोयल – वाणिज्य आणि उद्योग मंत्री
  • धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री
  • जीतन राम मांझी – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
  • राजीव रंजन सिंह उर्फ ​​ललन सिंह – पंचायत राज मंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री
  • सर्वानंद सोनोवाल – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री
  • वीरेंद्र कुमार – सामाजिक न्याय मंत्री
  • के. आर. नायडू – नागरी विमान वाहतूक मंत्री
  • प्रल्हाद जोशी – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री
  • जुआल ओरम – आदिवासी व्यवहार मंत्री
  • गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्री
  • अश्विनी वैष्णव – रेल्वेमंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री, आणि इलेक्ट्रॉनिक्स तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री
  • ज्योतिरादित्य सिंधिया – दळणवळण मंत्री, ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री
  • भूपेंद्र यादव – पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री
  • गजेंद्रसिंह शेखावत – सांस्कृतिक कार्य मंत्री आणि पर्यटन मंत्री
  • अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्री
  • किरेन रिजिजू – संसदीय कामकाज मंत्री, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री
  • हरदीप सिंग पुरी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री
  • मनसुख मांडविय – कामगार आणि रोजगार मंत्री आणि युवा कार्य तथा क्रीडा मंत्री
  • जी. किशन रेड्डी – कोळसा मंत्री आणि खाण मंत्री
  • चिराग पासवान – अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
  • सी. आर. पाटील – जलशक्ती मंत्री

Story img Loader