‘‘केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून मतपेढीचे राजकारण केले जात आहे,’’ अशी टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवारी नरेंद्र मोदी यांनी रविवारी पणजी येथे केली. अल्पसंख्याकांविरोधातील दहशतवादी खटल्यांची राज्य सरकारांनी पडताळणी करावी, असा प्रस्ताव शिंदे यांनी ठेवला आहे. त्यावर मोदी यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.
‘‘सुशीलकुमार शिंदे धार्मिक राजकारण खेळत आहेत. त्यांनी सर्व राज्य सरकारांना पत्र लिहिले आहे. गुन्हेगारांना जर तुम्ही अटक करत असाल, तर आधी हे पाहा की ते मुस्लीम आहेत काय? जर ते मुस्लीम असतील, तर त्यांना अटक करू नका, असे शिंदेंनी या पत्रात म्हटले आहे. पण असे का, गुन्हेगारांना कोणता धर्म असतो का,’’ असा सवाल विचारत मोदी यांनी शिंदेंवर जोरदार शरसंधान सोडले.
गुन्हेगारांना अटक करावी की त्यांना सोडून द्यावे हे धर्म ठरवतो का? धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाऊ नये. एका विशिष्ट धर्मातील गुन्हेगाराला शिक्षा करावी आणि एका विशिष्ट धर्मातील गुन्हेगाराला सोडून द्यावे हे योग्य नव्हे. धर्माच्या आधारावर कोणी राजकारण खेळू नये, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना या पत्राबाबत विचारले असता, त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले, असे मोदी यांनी सांगितले.
शिंदेंकडून मतपेढीचे राजकारण : मोदी
‘‘केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून मतपेढीचे राजकारण केले जात आहे,’’ अशी टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवारी नरेंद्र मोदी
First published on: 13-01-2014 at 01:48 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi accuses home minister sushil kumar shinde of vote bank politics