भारताने आज अविस्मरणीय आणि ऐतिहासिक क्षण अनुभवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती तो क्षण पूर्ण झाला असून भारत देश आता चंद्रावर पोहोचला आहे. भारताची अतिमहत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाली असून भारताने चंद्रावर पाठवलेले अंतराळयान चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचले आहे. हा क्षण सर्वांनीच दृश्यप्रणालीच्या माध्यमातून अनुभवला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दक्षिण अफ्रिकेतून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यानंतर भारतीयांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“माझ्या प्रिय कुटुंबियांनो, जेव्हा आपण आपल्या डोळ्यांदेखल असा इतिहास बनत असताना पाहतो तेव्हा जीवन धन्य होतं. अशी ऐतिहासिक घटना राष्ट्रजीवनाची चिरंजीव चेतना होऊन जाते. हा क्षण अविस्मरणीय आहे. हे क्षण अभूतपूर्व आहे.हे क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे. हा क्षण नव्या भारताचा जयघोषाचा आहे. हा क्षण अडचणींच्या महासागराला पार करण्याचा आहे. हा क्षण १४० कोटी लोकांच्या सामर्थ्याचा आहे. हा क्षण भारतात नवी ऊर्जा, नवा विश्वास, नव्या चेतानाचा आहे. हा क्षण भारताच्या उदयमान भाग्याच्या आवाहानाचा आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा >> Chandrayaan 3 मोहिमेसाठी सीमा हैदरने धरलाय उपवास, VIDEO पोस्ट करत म्हणाली….

इंडिया इज ऑन मून

“अमृत वर्षाचा पहिल्या टप्प्यात यशाचा वर्षाव झाला आहे. आम्ही पृथ्वीवर संकल्प केला आणि तो संकल्प चंद्रावर साकार केला. वैज्ञानिक सहकाऱ्यांनीही सांगितलं की इंडिया इज ऑन मून. आज आपण आंतरिक्षमध्ये नव्या भारताच्या नव्या उड्डाणाचे साक्षीदार बनलो आहोत. मी या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण अफ्रिकेत आहे. परंतु, प्रत्येक देशवासियांप्रमाणे माझं मन चंद्रयान अभियानात लागलं होतं. नवा इतिहास बनताच प्रत्येक भारतीय उत्साहात बुडाला. प्रत्येक घरात उत्सव सुरू झाला. हृदयपूर्वक मी ही आपल्या देशवासियांसह आणि कुटुंबासह उल्हास आणि आनंदाने सहभागी झालो आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा >> Chandrayaan 3 Landing Live : “१४० कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण”, चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर मोदींचे उद्गार

चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश

“मी चंद्रयान -3 साठी इस्रो आणि देशाच्या सर्व वैज्ञानिकांचं खूप खूप अभिनंदन करतो. ज्यांनी या क्षणासाठी वर्षानुवर्षे इतकं परिश्रम केलं. उत्साह, मन, आनंद या भावुकताने भरलेल्या अद्भूत क्षणासाठी मी १४० कोटी देशवासियांनाही कोटी कोटी शुभेच्छा देतो, असंही ते म्हणाले. माझ्या कुटुंबियांनो, आपल्या वैज्ञानिकांचे परिश्रम आणि प्रतिभामुळे भारत चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर पोहोचला आहे. जेथे आजपर्यंत जगातील कोणताही देश पोहोचलेला नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

आजपासून सगळी मिथकं बदलणार

“आजपासून चंद्राशी संबंधित मिथक बदलणार आहे. कथानकही बदलणार आहेत. नव्या पिढीसाठी म्हणीही बदलणार आहेत. भारतात आपण सर्वजण पृथ्वीला आई संबोधतो. चंद्राला मामा म्हणतो. पूर्वी म्हटलं जायचं की चंदा मामा खूप लाबंचे आहेत. आता एक दिवस असाही की लहान मुलं म्हणतील की चंद्रमामा दूरवर आहे”, असं ते म्हणाले.

सूर्य आणि शुक्र लक्ष्य

“आपण आपल्या सौरमंडळाच्या सीमांचे सामर्थ्य पाहणार आहोत. मानव जातीसाठी ब्रम्हांडाच्या अनेक संभावनांना साकार करण्यासाठी काम करणार आहोत. आपण भविष्यासाठी अनेक मोठे आणि महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठरवले आहेत. लवकरच सूर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी इस्रो आदित्य एल वन मिशन लॉन्च करणार आहे. यानंतर, शुक्रावरही इस्रोचे लक्ष्य आहे”, असं मोदींनी सांगितलं.

“गगनयानच्या माध्यमातून Human Spaceflight Mission साठी पूर्ण तयारीशी सज्ज आहे. भारत आज सिद्ध करत आहे की स्काय इज नॉट दि लिमिट. विज्ञान आणि तंत्रज्ञान देशाच्या उज्ज्वल भविष्याचा आधार आहे. यामुळे आजचा क्षण मी नेहमीसाठी लक्षात ठेवणार आहे. हरल्यानंतरही जिंकायचं कसं असतं याचं प्रतिक आजचा दिवस आहे, असंही मोदी म्हणाले.