बिहार विधानसभा निवडणुकीत जदयु, राजद आणि काँग्रेस महाआघाडीला खणखणीत बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे अभिनंदन केले. मोदी यांनी फोन करून नितीशकुमार यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दुसरीकडे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही ट्विटरच्या माध्यमातून नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांचे अभिनंदन केले. बिहारमधील मतदारांनी जो जनादेश दिला आहे. त्याचा आम्ही नम्रपणे स्वीकार करत असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.

Story img Loader