केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना लक्ष्य करत, “पंतप्रधान बनणे हे माझे स्वप्न नाही असे म्हणणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, हे कधीच पंतप्रधान बनू नयेत असे माझे स्वप्न आहे. त्यामुळे माझे आणि मोदींचे स्वप्न एकच आहे” अशी उपरोधिक टीका करणारे वक्तव्य थरूर यांनी केले.
इंदूरमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले असता पत्रकारांशी बोलताना थरूर यांनी मोदींवर अशी टीका केल्याचे थरूर यांच्या ट्विटर पेजवर नमूद करण्यात आले आहे. शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचे स्वप्न बघत नसल्याचे म्हटले होते. त्यांनी आपल्या भाषणातून २०१७ पर्यंत गुजरातची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. मोदींचे हे वक्तव्य राजकीय वर्तुळात सूचक पद्धतीने पाहिले जात आहे.

Story img Loader