नवी दिल्ली : ‘‘देशात परिवर्तन घडवून आणण्याच्या माझ्या वचनाने मला पंतप्रधान केले. कुशल कामगिरीने मला पुन्हा पंतप्रधान होण्याची संधी दिली. पुढील वर्षी १५ ऑगस्टला याच लाल किल्ल्यावरून मी देशाने मिळवलेले यश, तुमचे सामथ्र्य, तुमचे संकल्प, त्यामध्ये झालेली प्रगती, त्याचे गौरवगान अधिक आत्मविश्वासाने प्रस्तृत करेन’’, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिली.

७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून दीड तास भाषण करीत मोदींनी भ्रष्टाचार, घराणेशाही, तुष्टीकरणावरून विरोधकांवर टीकास्त्र डागले आणि २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर मीच पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होईन, असे स्पष्टपणे सूचित केले.संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांच्या ‘इंडिया’ने लोकसभेत मांडलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेला उत्तर देताना मोदींनी केलेल्या भाषणातील मुद्दय़ांची पुनरावृत्ती लाल किल्ल्यावर पाहायला मिळाली. संसदेमध्ये मोदींनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर थेट हल्लाबोल केला होता. इथे मोदींनी आगामी लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या संभाव्य मतदारांना उद्देशून ‘एनडीए’वर विश्वास दाखण्याचे आवाहन केले. ‘‘मी तुमच्यामधूनच आलो, तुमच्यासाठी जगतो, मी तुमच्यासाठी घाम गाळतो, तुम्ही माझे कुटुंब आहात, तुमचे दु:ख मी सहन करू शकत नाही, तुमचे संकल्प सिद्धीला नेण्यासाठी मी सेवक बनून काम करेन’’, असे मोदी म्हणाले. या विधानांमधून मोदींनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची दिशा निश्चित केली. १४० कोटी देशवासी माझे कुटुंब असल्याचे सांगत मोदींनी पुन्हा एकदा, ‘मी फकीर असून भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याची क्षमता फक्त माझ्यामध्ये आहे’, असा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवला.
‘‘भ्रष्टाचाराच्या वाळवीने देशातील सगळय़ा व्यवस्थांना पोखरून टाकले आहे. तुमचे हक्क हिरावून घेतले. आता भ्रष्टाचारमुक्तीची नवी स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. भ्रष्टाचार नष्ट करण्याचे मी वचन दिले आहे, त्यासाठी मी लढत राहीन’’ असे मोदी म्हणाले. ‘‘देशातील घराणेशाहीवर आधारलेल्या राजकीय पक्षांनी जनसामान्यांची क्षमता, योग्यता, सामथ्र्य नाकारले. त्यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाने सामाजिक न्यायाची हत्या केली. तुमच्यासारख्या सामान्य लोकांना विकासापासून वंचित ठेवले. २०४७ पर्यंत देशाला विकसित बनवायचे असेल तर भ्रष्टाचार सहन करू नका’’, असे नमूद करीत मोदींनी विरोधकांच्या ‘इंडिया’चे नाव न घेता मतदारांना महाआघाडीपासून दूर राहण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले.

भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या... (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP President Election : भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? संजय शिरसाट यांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले…
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

‘‘गेल्या नऊ वर्षांमध्ये १३.५ कोटी लोक गरिबातून मुक्त होऊन मध्यमवर्गात आले. मध्यमवर्ग वाढला की, देशाची क्रयशक्ती वाढते, अर्थचक्र अधिक वेगाने फिरू लागते’’, असे मोदी म्हणाले. ओबीसी समाजातील सोनार, धोबी असा विविध समाजघटकांसाठी विश्वकर्मा जयंतीनिर्मित्त नवी योजना लागू केली जाणार असून केंद्र सरकार १५ हजार कोटी खर्च करणार आहे. शेतकरी, फेरीवाले, शहरी गरीब यांच्यासाठी राबवलेल्या योजनांचा आणि आर्थिक मदतीचा मोदींनी उल्लेख केला.

भाजपने २०१४ व २०१९ मधील लोकसभा निवडणुका ‘राष्ट्रवादा’च्या आधारे जिंकल्या होत्या. यावेळी मोदींनी ‘राष्ट्रचरित्र’ या शब्दांची भर घातली. विकसित भारत घडवायचा असेल तर देशाची एकता महत्त्वाची आहे. पण, त्यास श्रेष्ठत्वाची जोड द्यावी लागेल. देशातील संस्था, सेवा, उत्पादने, निर्णयप्रक्रिया सर्व जागतिक दर्जाचे झाले पाहिजे. देशाच्या विकासाठी महिला सक्षमीकरणाचे अतिरिक्त सामथ्र्य गरजेचे आहे. प्रांतिक आशा-आकांक्षा पूर्ण कराव्या लागतील. भारत विश्वमित्र झाला पाहिजे. त्यासाठी साधनसुचिता, पारदर्शिता आणि निष्पक्षता हवी, असे मोदी म्हणाले.

हजार-बाराशे वर्षांपूर्वीच्या लढाईत झालेल्या राजाच्या पराभवाची छोटी घटना या देशाच्या इतिहासाला मोठे वळण देऊन गेली. देश गुलामगिरीत अडकला, लूटमार झाली, देश गरिबीच्या खाईत लोटला. हा हजार वर्षांच्या अत्यंत प्रतिकूल काळात असंख्य देशवासीयांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले, या स्वातंत्र्याच्या अमृतकाळाचे हे पहिले वर्ष आहे. आता देशाला तपस्या, त्याग करण्याची गरज आहे. हा काळ निर्णायक असून, पुढील हजार वर्षांचा सुवर्ण इतिहास लिहिला जाणार आहे. त्याचा जगावर प्रभाव राहणार आहे. १४० कोटी देशवासीयांची ऊर्जा जागृत होत असून, भारताला पुन्हा समृद्ध केले पाहिजे, असे मोदी म्हणाले. राष्ट्रचरित्र आणि गतवैभवाचे उद्दिष्ट ठेवून मोदींनी मतदारांना भावनिक आवाहन केले.

तरुण मतदारांवर लक्ष केंद्रित

संभाव्य मतदार म्हणून पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुण-तरुणींवर भाजपने लक्ष केंद्रित केलेले आहे. या संभाव्य मतदारांना केलेल्या आवाहनाचे पडसादही मोदींच्या भाषणात उमटले. मोदींनी ‘लोकसंख्या, लोकशाही आणि वहुविविधता’चाही मंत्र दिला. ३० वर्षांहून कमी वयोगटातील लोकसंख्या भारतात सर्वाधिक आहे. तरुण देशाचे भविष्य घडवत आहेत. ते भारतात डिजिटल क्रांती घडवत आहेत. गाव-खेडय़ातील, झोपडपट्टीत राहणारे तरुण क्रीडा क्षेत्रात योगदान देत आहेत. प्रयोगशाळेत असंख्य प्रयोग करत आहेत, उपग्रह बनवत आहेत. स्टार्टअप सुरू करत आहेत. तंत्रज्ञानावर आधारलेला भारत हेच तरुण घडवत आहेत. पूर्वी तरुणांना कर्तृत्व दाखवण्याची, यशस्वी होण्याची संधी मिळत नव्हती, आता त्यांना इतक्या संधी उपलब्ध आहेत की, कुठल्या क्षेत्रातील संधी मिळवायची इतकाच प्रश्न उरला आहे, असे मोदी म्हणाले.

‘मणिपूर शांततेच्या दिशेने’

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होत असल्याचा दावा पंतप्रधानांनी भाषणात केला. राज्यातील वांशिक समस्येवर उत्तर शोधण्यासाठी तेथील लोकांनी शांततेचा आधार घ्यावा, असे आवाहन मोदी यांनी केले. तेथील समस्या सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे. संपूर्ण देश मणिपूरबरोबर असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

‘मेरे प्यारे परिवारजनों’

पंतप्रधानांनी देशवासीयांना उद्देशून प्रथमच ‘परिवारजन’ हा नवा शब्दप्रयोग केला. दीड तासांच्या भाषणात त्यांनी जवळपास ५० वेळा ‘परिवारजन’ (मेरे प्यारे परिवारजनो) हा शब्द वापरला. त्याचवेळी ‘परिवारवाद’ हा शब्द १२ वेळा वापरून मोदींनी राजकारणातील घराणेशाहीवर कठोर टीका केली.

Story img Loader