भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी अमेरिकी व्हिसाठी अर्ज करू शकतात, त्यावर योग्य ती प्रक्रिया करून नंतर निर्णय घेतला जाईल, असे अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले.
परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मारी हार्फ यांनी सांगितले की, मोदी हे व्हिसासाठी अर्ज करू शकतात व नंतर त्यावर प्रक्रियेनुसार निर्णय घेतला जाऊ शकतो. २००५ मध्ये परराष्ट्र खात्याने मोदी यांचा व्हिसा रद्द करून २००२ च्या दंगलीमुळे त्यांचा व्हिसा रद्द केला होता व त्यांना अमेरिकेत येण्यास मनाई केली होती.अमेरिकेने वारंवार असे म्हटले होते की, अमेरिकेच्या व्हिसा धोरणात मोदी यांच्या संदर्भात अजिबात बदल झालेला नाही, पण ते व्हिसासाठी अर्ज करू शकतात व इतर अर्जदारांप्रमाणे वाट पाहू शकतात.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अलीकडेच १९८४ मधील शीख विरोधी दंगलीबाबत केलेल्या वक्तव्यावर विचारले असता त्या म्हणाल्या की, राहुल गांधी नेमके काय म्हणाले ते आपण पाहिलेले नाही. मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा मिळावा यासाठी प्रयत्न चालू असले तरी अजून त्यात फारसे यश आलेले नाही. त्यामुळे मोदींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अमेरिकेतील भारतीयांशी संपर्क साधावा लागत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा