पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांची यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यासहीत राज्यातील एकूण चार खासदारांना मंत्रीपद मिळालं आहे. तसेच आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे, ‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख पशुपती पारस,  ‘अपना दला’च्या अनुप्रिया पटेल यांचाही मोदींच्या मंत्रीमंडळामध्ये समावेश करुन घेण्यात आला आहे. हे सर्व मंत्री आज सायंकाळी मंत्रीपदाची शपथ घेतील असं एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

संसदेचं पावसाळी अधिवेशन होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ही चर्चा खरी ठरली असून, अखेर आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्यासह काही कॅबिनेट आणि काही राज्यमंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

एकीकडे राजीनामे घेण्यात आले असले तरी दुसरीकडे काही राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काही मंत्र्यांची बढती (प्रमोशन) करण्यात आलं आहे. यात हरदीप पुरी, अनुराग ठाकूर, जी. किशन रेड्डी, किरन रिजिजू, मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला यांना बढती मिळाली आहे. राज्यमंत्री असणाऱ्या या नेत्यांना कोणती नवीन जबाबदारी देण्यात येणार हे यादी जाहीर करताना स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

नक्की पाहा >> PM Modi Cabinet : मोदींच्या मंत्रिमंडळातून ‘हे’ दहा मंत्री OUT; राज्यातील दोन मंत्र्यांचाही समावेश

मंत्रीमंडळामध्ये समावेश करण्यात आलेल्या नेत्यांची यादी खालील प्रमाणे…

१) नारायण राणे</p>

२) कपिल पाटील

३) सर्वानंद सोनोवाल, (आसामचे माजी मुख्यमंत्री )

४) ज्योतिरादित्य शिंदे, (काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार)

५) रामचंद्र प्रसाद सिंघ

६) अश्विनी वैष्णव

७) पशुपती पारस (‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख)

८) किरन रिजिजू

९) राज कुमार सिंघ

१०) हरदीप पुरी

११) मनसुख मांडविया

१२) भुपेंद्र यादव

१३) पुरुषोत्तम रुपाला

१४) जी. किशन रेड्डी

१५) अनुराग ठाकूर

१६) पंकज चौधरी

१७) अनुप्रिया पटेल

१८) सत्यपाल सिंघ बाघेल

१९) रजीव चंद्रशेखर

२०) शोभा करंदलाजे

२१) भानू प्रताप सिंघ वर्मा

२२) दर्शना विक्रम जारदोश

२३) मिनाक्षी लेखी

२४) अन्नपुर्णा देवी

२५) ए. नारायणस्वामी

२६) कौशल किशोरे

२७) अजय भट्ट

२८) बी. एल वर्मा

२९) अजय कुमार

३०) चौहान दिव्यांशू

३१) भागवंत खुंबा

३२) प्रतिमा भौमिक

३३) सुहास सरकार

३४) भागवत कृष्णाराव कराड</p>

३५) राजकुमार राजन सिंघ

३६) भारती प्रवीण पवार

३७) बिश्वेश्वर तूडू

३८) सुशांतू ठाकूर

३९) डॉ. मुंजपारा महेंद्रभाई

४०) जॉन बिरला

४१) डॉ. एल मुरगन

४२) निशित प्रमाणिक

४३) डॉ. विरेंद्र कुमार

Story img Loader