पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. आज सायंकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनात ४३ मंत्र्यांना शपथ देण्यात येईल. मंत्रिमंडळात बरीच नवीन चेहरे सामील होत आहेत, तर काही दिग्गज चेहरेही बाहेर पडले आहेत. या मंत्रिमंडळात जिथे तरुणांना महत्त्व दिले जात आहे, तेथे महिलांचादेखील सहभाग वाढवण्यात आला आहे. याशिवाय जातीचे समीकरण सोडविण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी मंत्रिमंडळात मिनाक्षी लेखी यांच्यासह ७ महिलांना संधी देण्यात आली आहे. नव्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५८ वर्षे असेल. याशिवाय सरकारमधील कायदा व इतर तांत्रिक विषयातील तज्ज्ञांची संख्या वाढवण्याचीही काळजी घेण्यात आली आहे. महिलांमध्ये अनुप्रिया सिंह पटेल, शोभा करंदलाजे, मिनाक्षी लेखी, अन्नपुर्णा देवी, भारती प्रवीण पवार, दर्शना विक्रम जारदोश यांचा समावेश असेल.

ठरलं! नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातील चौघांचा मंत्रिमंडळात समावेश; मंत्र्यांची यादी जाहीर

भारतीय जनता पार्टी (भाजपा) सरकार उज्ज्वला योजना आणि प्रधानमंत्री जन-धन योजनेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने महिलांशी जोडले आहे. यावेळी मंत्रिमंडळातील निम्म्या लोकसंख्येचा वाटा लक्षणीय वाढविला जात आहे. नव्या मंत्रिमंडळात ७ महिला मंत्री असतील.

Story img Loader