नवी दिल्ली : कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रचारसभा २८ एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतर ७ मे पर्यंत मोदींचे झंझावाती दौरे राज्यभर आयोजित करण्यात आल्याचे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे.भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन्ही दिग्गज नेते सध्या कर्नाटकमध्ये जाहीरसभा तसेच, रोड शो घेत आहेत. पण, भाजपसाठी मोदी हेच निवडणुकीचा चेहरा असल्याने त्यांच्या सहभागानंतर भाजपच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने गती मिळेल. मोदी सहा दिवसांमध्ये १२ ते १५ जाहीरसभा व रोड शो घेणार आहेत. मोदी २८ व २९ एप्रिल, ३ व ४ मे तसेच, ६ व ७ मे अशी तीन टप्प्यांमध्ये प्रचार करतील.

गेल्या आठवडय़ामध्ये भाजपने ४० नेत्यांचा समावेश असलेल्या तारांकित प्रचारकांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही समावेश असून योगी बुधवारपासून कर्नाटकमध्ये निवडणूक प्रचार सुरू करतील. योगींच्या बुधवारी तीन जाहीरसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. २०१७ नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये योगी आदित्यनाथ यांचा आक्रमक प्रचार आकर्षण ठरले होते. यावेळी कर्नाटकमध्ये हिजाब, हलाल यासारख्या वादग्रस्त विषयांवर अधिक भर न देण्याचे भाजपने ठरवले असल्याने योगींच्या भाषणातील मुद्दय़ांची उत्सुकता असेल. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करोनामुक्त झाले असून तेही बुधवारी कर्नाटक दौऱ्यावर असतील.कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान होणार असून १३ मे रोजी मतमोजणी होईल. भाजपसाठी कर्नाटक राज्य दक्षिण भारताचे प्रवेशद्वार असून इथे सत्ता राखण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे.

pm narendra modi in wardha on september 20 on occasion of one year of the pm vishwakarma yojana
पंतप्रधानांचा दौरा अन् प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज दिवसभर जिल्ह्यात…
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
mahayuti will contest assembly elections under the leadership of cm eknath shinde says ajit pawar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक; अजित पवार यांची माहिती
government schemes Eknath shinde marathi news
सर्वसामान्यांच्या योजना कायम राहणार – मुख्यमंत्री
Narendra Modi Wardha tour Union Ministry of Micro and Small Scale Vishwakarma Yojana Programme
आमचे काय ? पंतप्रधानांचा दौरा आणि भाजप नेत्यांना पडला पेच, जिल्हाधिकाऱी म्हणतात हा तर…
Vijay Wadettiwar, Congress MP, Chandrapur,
वडेट्टीवार यांना पराभूत करा, कॉंग्रेस खासदाराचे अप्रत्यक्ष आवाहन
After Ajit Pawars visit NCP state general secretary resigned in Nagpur
अजित पवारांच्या दौऱ्यानंतर नागपुरात पक्षात पडझड, प्रदेश सरचिटणीसाचा राजीनामा
book Diary of Home Minister
सावधान ! अनिल देशमुख यांचे पुस्तक येत आहे, निवडणुकीपूर्वी येणार मोठे राजकीय वादळ