पीटीआय, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा एक भाग म्हणून रविवारी नागरिकांना त्यांच्या व्यक्तिगत समाजमाध्यम खात्यांच्या ‘दर्शनीय चित्रा’च्या (डिस्प्ले पिक्चर-डीपी) जागी राष्ट्रध्वजाचे चित्र लावण्याचे आवाहन केले.
मोदींनी आपल्या समाजमाध्यम खात्याच्या ‘डीपी’ राष्ट्रध्वजाचे छायाचित्र लावले आहे.१३ ते १५ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधानांनी शुक्रवारी नागरिकांना केले.