Narendra Modi in Wardha Calls Congress Anti-Hindu : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (२० सप्टेंबर) वर्धा दौऱ्यावर आहेत. वर्ध्यात त्यांच्या हस्ते अनेक विकसकामांचं भूमिपूजन करण्यात आलं. दरम्यान, यावेळी आयोजित जाहीर सभेत बोलताना मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने नेहमीच आमच्या आस्थेचा, श्रद्धेचा व संस्कृतीचा अपमान केला आहे, असा आरोप मोदी यांनी यावेळी केला. ते म्हणाले, “या काँग्रेसवाल्यांनी तर आपल्या गणपती बाप्पाला थेट तुरुंगात टाकलं होतं. काँग्रेसने नेहमीच अर्बन नक्षलवादाचं समर्थन केलं आहे. काँग्रेस हा बेईमान व भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष आहे”.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, तुकडे-तुकडे गँगचे लोक व शहरी नक्षलवादी मिळून काँग्रेस पक्ष चालवत आहेत. कांग्रेस हा देशातील सर्वात अप्रामाणिक व भ्रष्ट पक्ष आहे. काँग्रेसचा शाही परिवार देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणून ओळखला जातो. काँग्रेसने आजवर आपली संस्कृती आपल्या आस्थेचा कधीच सन्मान केला नाही. त्यांनी जर आपल्या संस्कृतीचा, आस्थेचा सन्मान केला असता तर त्यांनी गणेशोत्सवाचा, गणपती बाप्पाच्या पूजेचा विरोध केला नसता. हे लोक गणपती बाप्पाच्या पूजेचा विरोध करतात.

हे ही वाचा >> Supreme Court : ‘बंगळुरूत पाकिस्तान’, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कथित वादग्रस्त वक्तव्याची सरन्यायाधीशांनी घेतली दखल, मागवला अहवाल

मला गणेशाची पूजा करताना पाहून काँग्रेसचं तुष्टीकरणाचं भूत जागं झालं : मोदी

पंतप्रधान म्हणाले, गणेशोत्सव हा भारताच्या एकात्मतेचा उत्सव आहे आणि महाराष्ट्राची भूमी त्याची साक्षीदार आहे. स्वातंत्र्याच्या लढाईच्या काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. प्रत्येक समाजाला, वर्गाला एकत्र आणलं. काँग्रेसने मात्र या गणेशोत्सवाचा तिरस्कार केला आहे. अलीकडेच मी गणेशोत्सवाच्या एका कार्यक्रमात सहभागी झालो होतो. ते पाहून काँग्रेसचा जळफळाट झाला. त्यांचं तुष्टीकरणाचं भूत जागं झालं. त्यांनी गणेश पूजनाच्या कार्यक्रमाचा विरोध केला. एका वर्गाचं, समाजाचं तुष्टीकरण करण्यासाठी काँग्रेस काहीही करू शकते.

हे ही वाचा >> Supreme Court Youtube Channel: सर्वोच्च न्यायालयाचं यूट्यूब चॅनल हॅक? कोलकाता बलात्कारसह महत्त्वाच्या प्रकरणांची चालू आहे सुनावणी!

काँग्रेसने गणपती बाप्पाला तुरुंगात टाकलं; मोदींचा आरोप

नरेंद्र मोदी म्हणाले, कर्नाटकमध्ये तर काँग्रेसने कहर केला. त्यांचा गणेशोत्सवाला एवढा विरोध आहे की त्यांनी गणपती बाप्पाला तुरुंगात टाकलं. ज्या गणेश मूर्तीची लोक पूजा करत होते ती मूर्ती पोलिसांच्या व्हॅनमध्ये टाकून पोलीस ठाण्यात नेली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi claims karnataka govt arrested lord ganesha call congress anti hindu asc