पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याची हत्या झाल्यानंतर मोठा हिंसाचार घडला. या हिंसाचारात दहा जणांचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला लक्ष्य केलं जातंय. पश्चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे हिंसाचार थांबवण्याची गरज व्यक्त करत केंद्राकडून जी मदत हवी असेल ती देऊ, असे आश्वासन दिले आहे. तसेच राज्य सरकार या घटनेनंतर योग्य ती कारवाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्यामधील एका कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने सहभाग घेतला. यावेळी त्यांनी बीरभूम येथील हिंसाचाराचा उल्लेख केला. “पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिसांचाराबद्दल मी शोक व्यक्त करतो. या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी केंद्र सरकारकडून जी मदत हवी असेल ती देण्याचे मी आश्वासन देतो. या घटनेतील आरोपींविरोधात राज्य सरकार कठोर कारवाई करेल अशी अपेक्षा करतो,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

तर या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या हिंसाचे समर्थन करत नसल्याचे सांगितले. तसेच घटना घडली त्या गावात जाऊन लोकांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. “मी हिंसाचाराचं समर्थन करत नाही. पण अशा घटना यापूर्वी राजस्थान आणि गुजरातमध्येही घडल्या आहेत. मी हिंसाचार झालेल्या रामपुरहाट गावात जाणार असून तिथल्या लोकांची भेट घेणार आहे,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

बीरभूम जिल्ह्यात नेमकं काय घडलं ?

दरम्यान, पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बारशाल ग्रामपंचायत क्षेत्रात मोठा हिंसाचार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तृणमूल काँग्रेसचे नेते भादू शेख यांची सोमवारी हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर येथे रात्री जाळपोळ करण्यात आली. या जाळपोळीमध्ये तब्बल १० मृत्यू झाला. भादू शेख हे बोगतुई गावचे रहिवासी होते. भादू शेख यांच्यावर चार दुचाकीस्वारांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या

Story img Loader