पीटीआय, आरामबाग

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संदेशखालीत महिलांवरील अत्याचारांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या मुद्दय़ावर संपूर्ण देश संतप्त झाला असल्याचे ते म्हणाले.संदेशखालीतील भयावह मुद्दय़ावर संपूर्ण मौन बाळगल्याबद्दल मोदी यांनी विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीवरही टीका केली.

‘संपूर्ण देश बंगालमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. माँ, माटी व मानुष यांचे ढोल वाजवणाऱ्या तृणमूल काँग्रेसने संदेशखालीच्या भगिनींबाबत काय केले आहे हे पाहून संपूर्ण देश दु:खी व संतप्त आहे. तृणमूलने येथील भगिनींबाबतकाय केले आहे, ही लज्जेची बाब आहे’, असे हुगळी जिल्ह्यातील आरामबाग येथील सभेत मोदी यांनी सांगितले.

हेही वाचा >>>Video: “आज गावागावांत गरीब, मजूर, शेतकरी दु:खी आहे”, नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, “विकास झालाय, पण…!”

तृणमूल सरकार सर्वच क्षेत्रांत भ्रष्ट असल्याचा आरोप करून मोदी म्हणाले, ‘‘इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठी, संदेशखालीतील तृणमूलने छळ केलेल्या लोकांसोबत उभे राहण्याऐवजी भ्रष्ट व तुष्टीकरणाच्या राजकारणाला पािठबा देणे हे अधिक महत्त्वाचे आहे’’.

कोटय़वधींच्या प्रकल्पांचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील आरामबाग भागात ७२०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले व शिलान्यास केला. रेल्वे, बंदरे, तेलवाहिन्या, एलपीजी पुरवठा आणि मलजल प्रक्रिया यांसारख्या क्षेत्रांशी संबंधित अनेक विकास प्रकल्पांचा पंतप्रधानांनी शिलान्यास केला व त्यांचे लोकार्पण केले.

हेही वाचा >>>लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक, लवकरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार!

झारखंडमधील प्रकल्पांचाही समावेश

पंतप्रधानांनी झारखंडमध्येही ३७,५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन व शिलान्यास केला आणि राज्याच्या विकासाला चालना देण्याचे आश्वासन दिले. इतर प्रकल्पांसह, पंतप्रधानांनी धनबाद जिल्ह्यातील हिंदुस्तान उर्वरिक व रसायन लि.चा ८९०० कोटी रुपयांचा खत प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi criticizes trinamool congress party over atrocities under the sandeshkhali amy
Show comments