भाजप हा विषारी लोकांचा पक्ष असल्याची टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली होती. त्याला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसपेक्षा कोणताच पक्ष अधिक विषारी नाही, असे उत्तर मोदींनी येथील प्रचारसभेत काँग्रेसला दिले आहे. गुजरातला लागून असलेल्या आदिवासीबहुल भागात मोदींची प्रचारसभा झाली.
सत्ता हे विष आहे असे सोनियांनी सांगल्याचे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत, मोदींनी त्याची खिल्ली उडवली. देशावर काँग्रेसची जवळपास ५० वर्षे सत्ता आहे. मग या विषाची चव कुणाला मिळाली, असा सवाल मोदींनी केला. माध्यमे जवळपास असतात तेव्हा राहुल गांधी गरिबीबद्दल बोलतात. मात्र झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी त्यांनी काहीही केलेले नाही, अशी टीका मोदींनी केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या मतदारसंघात राहुल गांधी यांचा बंगला आहे. त्याच परिसरात झोपडपट्टी आहे. तिथे आठशे लोक राहतात. मात्र त्यांच्यासाठी दोनच शौचालये आहेत. या गोष्टी काँग्रेसला कशा दिसत नाहीत? वाढत्या महागाईबद्दल जनतेने काँग्रेसला धडा शिकवावा, असे आवाहन मोदींनी केले.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, पंतप्रधान तसेच राहुल गांधी यांनी राजस्थानमध्ये प्रचार दौरा केला. मात्र त्यांनी महागाईबाबत चकार शब्दही काढला नाही, याबाबत मोदींनी आश्चर्य व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi hits back at sonia gandhi says no party more poisonous than congress
Show comments