गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन गुजरातच्या विकासासंदर्भात चर्चा केली. आजची बैठक ही नक्कीच फलदायी ठरेल अशी आशा मोदींनी बैठकीनंतर व्यक्त केली. केंद्र आणि गुजरात राज्य सरकार यांच्यामध्ये असलेली दरी भरून काढण्यावर भर दिला जाईल अशी ग्वाही पंतप्रधनांनी दिली असल्याचेही मोदी म्हणाले.
गॅस पुरवठ्याच्या बाबतीत गुजरात राज्य सरकारची केंद्र सरकारसोबत कायदेशीर लढाई सुरू आहे. ज्या भावात मुंबई आणि दिल्लीला गॅसचा पुरवठा होतो त्या भावात गुजरातला होत नाही. याबाबात आम्ही न्यायालयात गेलो आणि ही लढाई जिंकलो. मात्र, त्यानंतर केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले. यामध्ये हा निर्णय लांबणीवर नेण्याचा त्यांचा सतत प्रयत्न आहे. त्यामुळे पंतप्रधान यामध्य़े लक्ष घालतील असं आश्वासन त्यांनी मला दिलं असल्याचं मोदी म्हणाले.
मोदींनी नर्मदेशी निगडीत सरदार सरोवर धरणाबाबतही पंतप्रधानांशी चर्चा केली. ब-याच कालावधीपासून हे काम रखडले असल्याने धरणावर दरवाजे बांधण्यास केंद्र लवकरच परवानगी देईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
आज दुपारी तरूणांसमोर मोदी भाषण करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा