पीटीआय, जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या १५ व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले. दक्षिण आफ्रिकेचे उपाध्यक्ष पॉल माशातिले यांनी विमानतळावर त्यांचे सन्मानाने स्वागत केले आणि त्यांना सलामी देण्यात आली. यावेळी विमानतळावर मोदी यांच्या स्वागतासाठी मोठय़ा प्रमाणात भारतीय वंशाचे लोक उपस्थित होते. त्यामध्ये प्रिटोरिया हिंदू समाज संस्थेच्या कार्यकर्त्यांचा आणि स्वामीनारायण संस्थेच्या सदस्यांचा समावेश होता.

करोना महासाथीनंतर ‘ब्रिक्स’ देशांच्या राष्ट्रप्रमुखांची प्रथमच प्रत्यक्ष समोरासमोर शिखर परिषद होत आहे. ही परिषद मंगळवार ते गुरुवार अशी तीन दिवस चालणार आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेल्या ब्रिक्सच्या रशिया वगळता इतर सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधान मोदी यांची भेट होईल. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलेले असल्यामुळे ते दक्षिण आफ्रिकेला न जाता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
raj thackeray rally in thane
सत्ता आली तर मशिदीवरील भोंगे ४८ तासात उतरवेन ; राज ठाकरे
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!
Mumbai traffic routes marathi news
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल
nirmala sitharaman to meet states finance ministers for budget preparation
निर्मला सीतारामन अर्थसंकल्पाच्या तयारीला, राज्यांच्या अर्थमंत्र्यांची भेट घेणार! जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी मसलतही विषयपत्रिकेवर

त्यापूर्वी, शिखर परिषदेसाठी निघताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जगातील मोठय़ा लोकसंख्येच्या समस्यांवर चर्चा आणि विचारविनिमय करण्यासाठी ब्रिक्स हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. त्यामध्ये अनेक स्तरांवर विकास आणि सुधारणा यांचा समावेश आहे. या शिखर परिषदेमध्ये सदस्य देशांना भविष्यात सहकार्याचे क्षेत्र ओळखणे आणि संस्थात्मक विकासांचा आढावा घेणे यासाठी उपयुक्त संधी मिळणार आहे. या परिषदेसाठी आफ्रिका खंडातील आणि पश्चिम आशियामधील २० पेक्षा जास्त राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे. मंगळवारी आणि गुरुवारी होणाऱ्या विविध चर्चामध्ये हे राष्ट्रप्रमुख सहभागी होणार आहेत. तर बुधवारी होणाऱ्या शिखर परिषदेत केवळ ‘ब्रिक्स’चे सदस्य देश सहभागी होणार आहेत.

जगात ‘ब्रिक्स’च्या सदस्य देशांचे स्थान

‘ब्रिक्स’ गटामधील ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये जगातील ४१ टक्के लोकसंख्या राहते आणि या पाच देशांचा जागतिक जीडीपीचा वाटा २४ टक्के आहे. तसेच या पाच देशांमध्ये होणारा व्यापार हा जागतिक व्यापाराच्या १६ टक्के आहे.