नरेंद्र मोदी हे ‘सेल्फी’च्या प्रेमात असलेले स्वार्थी पंतप्रधान असल्याची टीका माजी केंद्रीय नेते कपिल सिब्बल यांनी केली . ते ‘द इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. मोदी यांनी चीन दौऱ्यात चीनी पर्यटकांना ई-व्हिसा देण्याची एकतर्फी घोषणा करून खूप मोठी चूक केली आहे. हा भारताच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता. या माध्यमातून अरूणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील स्टेपल्ड व्हिसासंदर्भात मोदींना चीनशी चर्चा करता आली असती. मात्र, त्यांनी ही संधी गमावली. याशिवाय, चीन दौऱ्यावर परराष्ट्र मंत्री आणि पंतप्रधानांकडून व्हिसा संदर्भात परपस्परविरोधी वक्तव्ये केली जात होती. यावरून एक स्पष्ट होते की, परराष्ट्र मंत्रालय ई-व्हिसाबाबत सकारात्मक नसूनही मोदी केवळ हट्टासाठी मंत्रालयाला न जुमानता हा मुद्दा पुढे रेटला असल्याचे मत सिब्बल यांनी व्यक्त केले. परराष्ट्र धोरण हे कायम नीट विचार करूनच ठरवले गेले पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्या पाहिजेत, असेही सिब्बल यांनी सांगितले.
मोदी यांनी गेल्या गुरुवारी चिनी पर्यटकांना ई-व्हिसा देण्याची घोषणा केली होती. या सुविधेमुळे दोन्ही देशांमधील नागरिकांना परस्परांशी देवाणघेवाण करणे सोयीचे ठरेल, या शब्दांत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते होंग ली यांनी पत्रकार परिषदेत मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र या घोषणेला सकारात्मक प्रतिसाद देण्यासंबंधी मौन बाळगले होते. या सुविधांचा गैरवापर केला जाण्याची शक्यता गृहीत धरून चिनी पर्यटकांना ई-व्हिसा देण्यास भारताचे गृहमंत्रालय तसेच पर्यटन मंत्रालयाने तीव्र विरोध केला होता. परंतु तरीही मोदी यांनी आपल्या चीन दौऱ्यात यासंबंधी घोषणा केली होती.
नरेंद्र मोदी हे ‘सेल्फी’च्या प्रेमात असलेले स्वार्थी पंतप्रधान – कपिल सिब्बल
नरेंद्र मोदी हे 'सेल्फी'च्या प्रेमात असलेले स्वार्थी पंतप्रधान असल्याची टीका माजी केंद्रीय नेते कपिल सिब्बल यांनी केली .
आणखी वाचा
First published on: 21-05-2015 at 01:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi is a prime minister who believes in selfies not selflessness says kapil sibal