भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या मनात समाजवादी पक्षाची भीतीअसल्याचे मत पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी व्यक्त केले आहे.
मुलायम म्हणतात की, “केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी उत्सुक असलेल्या मोदींच्या मनात समाजवादी पक्षाची भिती आहे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या निराशेच्या मनस्थितीतून जनतेसमोर अनेक खोटी विधाने करत आहेत. त्यांनी गुजरातच्या विकासाबाबत खोटी विधाने करण्याची हद्दच पार केली आहे.” तसेच मोदींच्या कार्यकाळात गुजरातमध्ये हजारो शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत आणि २० लाखांहून अधिक जण बेरोजगार झाले असल्याचा आरोपही मुलायम यांनी यावेळी केला. तसेच समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशात केवळ चार शेतकऱयांनी आपल्या वैयक्तीक कारणात्सव आत्महत्या केल्याचे म्हणत मुलायम यांनी ‘सपा’ सरकारचे कौतुक केले.
गुजरातमधील रुग्णालयांमध्ये औषधे आणि डॉक्टरांचीही कमतरता आहे. तेथील महिलांमध्ये कुपोषणाचे प्रमाणही अधिक असल्याचा दावाही मुलायम यांनी यावेळी केला. तसेच तब्बल ४४,००० बालके गुजरातमध्ये बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न गुजरात सरकारकडून केले जात नसल्याचा आरोपही मुलायम यांनी केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा