नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी यांच्यापेक्षा ए. के. ऍंटनी आणि दिग्विजयसिंह यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याची अधिक क्षमता असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे माजी नेते गोविंदाचार्य यांनी सोमवारी व्यक्त केले. ऑल इंडिया इलेक्ट्रिसिटी लेबरर्स फेडरेशनच्या परिषदेसाठी ते येथे आले होते. परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.
ते म्हणाले, ऍंटनी आणि दिग्विजयसिंह या दोघांनीही प्रशासकीय कामाचा अनुभव असल्याने ते पंतप्रधानपदाचे काम चांगल्या पद्धतीने करू शकतात. नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी हे काही पंतप्रधानपदासाठी लायक नाहीत. त्यापेक्षा लालकृष्ण अडवानी हे पंतप्रधानपदासाठी भाजपचे सक्षम उमेदवार ठरतील. मोदी हे केंद्रीय गृहमंत्री होण्यास योग्य आहेत.

Story img Loader