परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे(भाजप) उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर झोंबरी टीका केली. याआधी मोदींना नपुंसक ठरविणाऱया खुर्शीद यांनी आता मोदी अजूनही बालवाडीतील विद्यार्थी असल्याचे म्हटले आहे.
खुर्शीद म्हणाले की, “गुजरातमधील दंगली संदर्भात क्लिन चीट देण्यात आल्याचा मोदींचा दावा म्हणजे बालवाडीतील विद्यार्थ्याला चांगले गुण मिळाल्यामुळे त्याने आता आपण पीएच डी मिळवून डॉक्टर झालो असा विचार केल्यासारखे आहे.”
सलमान खुर्शीद नरेंद्र मोदींवरील खरमरीत टीकांमुळे नेहमी चर्चेचा विषय राहीले आहेत. याआधी मोदींवर वैयक्तिक टीका करून मोदी नपुंसक असल्याचे खुर्शीद म्हणाले होते. यावक्तव्यावर खुद्द काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीही नाराज झाले होते. खुर्शीद यांच्या आताच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Story img Loader