भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी बुधवारी एका कार्यक्रमानिमित्त अहमदाबादमध्ये एकाच व्यासपीठावर आले. गेल्या महिन्यात भोपाळमधील कार्यक्रमात हे दोघेही एकाच व्यासपीठावर दिसले होते.
अडवाणी आणि मोदी यांनी एकत्रितपणे अहमदाबाद महापालिकेने उभारलेल्या बागेचे उदघाटन केले. साबरमती नदीतीरावर नदी सुधार योजनेतून ही बाग उभारण्यात आली आहे. त्याचेच उदघाटन या दोघांनी केले.
मोदी यांच्या उपस्थितीत अडवाणी या बागेचे लोकार्पण करतील, असे अहमदाबाद महापालिकेने काढलेल्या निमंत्रणपत्रिकेत म्हटले होते. गांधीनगर मतदारसंघातूनच लोकसभेवर निवडून गेलेले अडवाणी २०११ नंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.
अडवाणी, मोदी अहमदाबादमध्ये एकाच व्यासपीठावर
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी बुधवारी एका कार्यक्रमानिमित्त अहमदाबादमध्ये एकाच व्यासपीठावर आले.
First published on: 16-10-2013 at 04:48 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi l k advani come together for an event in ahmedabad