नवी दिल्ली येथे भाजपची राष्ट्रीय परिषद सुरू आहे. यात परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टिका करत काँग्रेसने आत्तापर्यंत देशाच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम केले आहे. त्यांना देशाच्या विकासाशी काही घेणे देणे नाही. देशाचा विकास करायचा हे काँग्रेसच्या रक्तातचं नाही असे म्हटले आहे.   
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय परिषदेत बोलताना मोदी म्हणाले, की “भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी माझा शनिवारी केलेला सन्माना बद्दल आभार व्यक्त करण्यास माझे शब्दही अपूरे पडतील, भारतीय जनता पक्ष हा खरचं विकासात्मक विचार करणारा पक्ष आहे याचा मला अभिमान आहे.”

नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे-
* देशाचे विकास करणे काँग्रेच्या रक्तातचं नाही
*  संपूर्ण देश काँग्रेसला कंटाळला आहे त्यामुळे काँग्रेसला मतदान करण्यात कोणालाच इच्छा राहीलेली नाही
* सध्याच्या योजना आणि व्यवस्था बघता देशात सुशासन ठेवण्याची यूपीए सरकारमध्ये कुवत नाही
* प्रणब मुखर्जी पंतप्रधान असते तर देशाचे इतके नुकसान झाले नसते
* भारताकडे विकास करण्याच्या सर्व शक्यता आहेत. पण काँग्रेसमध्ये नाहीत

Story img Loader