अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदींची विजयी सभा
गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त केल्यानंतर अहमदाबाद येथील विजयी सभेत नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जनतेचे आभार व्यक्त केले. भाजप पक्षाला मिळालेला विजय हा विकास आणि सुशासनाचा विजय आहे असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले व गुजरात राज्य सर्वसमावेशक विकासाचे मॉडेल असल्याचेही ते म्हणाले. आज झालेले मतदान हे प्रांतवाद, जातीवाद टाळून झाले याचा आनंदही मोदींनी व्यक्त केला. तसेच देशाने गुजरात राज्याकडून शिकावे असेही ते म्हणाले. आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारे काही चुक झाली असल्यास गुजरात जनतेची माफीही मोदींनी मागीतली व पुढे काही चुका न होण्यासाठी आशिर्वाद ही मागीतला. देशाला सध्या विकासाची भूक निर्माण झाली आहे आणि ती भूक पुर्ण करण्याचा प्रयत्न पुढील पाच वर्षात करणार असल्याचेही आश्वासन मोदींनी दिले.
गुजरातमधील विजयाचा हिरो गुजरातची सहा कोटी जनताचं आहे, पैशाच्या पावसाला आज घामाच्या पावसाने हरवले आहे. त्यामुळे गुजरात आणि हिमाचलप्रदेशची तुलना करण्याची गरज नसल्याचेही मोदींनी स्पष्ट केले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा