पीटीआय, नवी दिल्ली : दिल्ली मेट्रोच्या विमानतळ मार्गाच्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तत्पूर्वी त्यांनी मेट्रोतून प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधला. उद्घाटन झालेला हा मार्ग यशोभूमी द्वारका सेक्टर २५ स्थानकापर्यंत जातो. विमानतळ मार्गाचा सुमारे दोन किलोमीटर विस्तार करण्यात आला आहे. त्यानिमित्त नवीन स्थानकात मोदी यांनी कोनशिलेचे अनावरण केले, असे सूत्रांनी सांगितले. मोदी यांनी धौला कुआं स्थानकापासून नव्या यशोभूमी द्वारका सेक्टर २५ मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या प्रवासात अनेकांनी मोदी यांच्याशी संवाद साधत त्यांच्याबरोबर सेल्फी काढले. एका महिला प्रवाशाने मोदी यांना वाढदिवसानिमित्त संस्कृत भाषेत शुभेच्छा दिल्या. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मोदी यांनी ज्या मेट्रोने प्रवास केला, तिचा वेग ताशी १२० किलोमीटर होता. एअरपोर्ट एक्स्प्रेस मार्गावर वाढीव वेगाने मेट्रो जाण्याची औपचारिक सुरुवात यातून झाली. या मार्गाच्या विस्तारित भागाचे उद्घाटनही मोदी यांनी केले. या अतिवेगाच्या मार्गिकेचा विस्तार द्वारका सेक्टर २१ पासून यशोभूमी द्वारका भुयारी स्थानकापर्यंत झाला आहे.