अमेरिकन कॉंग्रेसच्या २५ सदस्यांच्या एका समूहाने मागणी केली आहे कि नरेंद्र मोदी यांना वीजा देण्यावर लावण्यात आलेले निर्बंध कायम ठेवले जावेत.
अमेरिकन कॉंग्रेसच्या २५ सदस्यांच्या एका समूहाने परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्याकडे ही मागणी केली आहे. त्यांनी आपल्या मागणीचे समर्थन करताना म्हटले कि, मोदी सरकार २००२ च्या गुजरात दंगलीतीत बळी पडलेल्या निरपराध लोकांना योग्य न्याय देण्यात अकार्यक्षम ठरली आहे.
अमेरिकन प्रतिनिधी सभेच्या २५ सदस्यांनी हिलरी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, त्यांना वाटतं मोदींना वीजा देण्यासाठी अमेरिकन कायद्यात बदल केल्यास दंगलीबाबत तपास कार्यात अडथळा आणण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांना बळ मिळेल.
गेल्या २९ नोव्हेंबर रोजी लिहिलेले हे पत्र काल (सोमवार) प्रसारमाध्यमाना देण्यात आले. रिपलिब्कन पार्टी्चे सदस्य जो पिट्स आणि फ्रैंक वोल्स यांनी कॅपिटल हिलमध्ये २००२ च्या गुजरात दंगलीतील पीड़ित कुटुंबातील सदस्यांसोबत एक संयुक्त प्रतिनिधी सम्मेलन आयोजित केले होते, त्यावेळेस हे पत्र जाहिर करण्यात आले.  

Story img Loader