भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) प्रमुख मायावती यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. गुरूवारी देशात सहाव्या टप्प्याचे मतदान सुरू असताना नरेंद्र मोदीनी जाणूनबुजून शक्तीप्रदर्शन करत वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस नरेंद्र मोदींनी जाणीवपूर्वक निवडल्याचा आरोप मायावतींनी केला आहे. यावेळी वाराणसीत देशाचे भावी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची प्रतिमा तयार करण्यासाठी भाजपकडून ज्याप्रकारे शक्तीप्रदर्शन करण्यात आले त्याविषयी मायावतींनी आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाने याप्रकाराची दखल घ्यावी आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात तातडीने कारवाई करावी अशी मागणी मायवतींनी पत्रकारपरिषदेत केली आहे. तसेच वाराणसीत नरेंद्र मोदींची हवा तयार करण्यासाठी बाहेरून लोकांना आणून गर्दी जमविण्यात आली होती. जेणेकरून, पूर्वांचलमधील निवडणुकांमध्ये भाजपला जास्तीत जास्त फायदा होईल असा आरोपसुद्धा मायावतींनी केला आहे.
मायावतींची नरेंद्र मोदींविरोधात कारवाईची मागणी
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) प्रमुख मायावती यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
First published on: 25-04-2014 at 04:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi nomination mayawati wants election commission action