Marathi to Get Classical Language Status : मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दशकांपासून करत आली आहे. आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी देखील ही मागणी लावून धरली होती. अखेर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजाद दर्जा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे.

मराठी भाषेला निवडणुकीच्या तोंडावर अभिजात भाषेचा दर्जा

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गेल्या अनेक वर्षांची मागणी होत होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा दिला आहे. या घोषणेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक पोस्ट एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस!” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मराठी भाषा ही देशातली अद्वितीय भाषा आहे असं म्हणत या भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) पोस्ट केली आहे.

हे पण वाचा- Raj Thackeray : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज ठाकरेंची पहिली पोस्ट, म्हणाले; “मी…”

काय आहे नरेंद्र मोदींची पोस्ट?

मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटलं आहे.

तमिळ, संस्कृत, मल्याळम, तेलुगू, कन्नड आणि ओडिया या सहा भाषांना हा दर्जा मिळाला होता. त्यात आता मराठी, बंगाली, पाली, प्राकृत व आसामी भाषेचा समावेश झाला आहे.

अभिजात दर्जा मिळणे म्हणजे काय?

देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तमिळ भाषेला सर्वात आधी २००४ साली अभिजात दर्जा प्रदान करण्यात आला. त्यापाठोपाठ संस्कृत (२००५), कन्नड (२००८), तेलुगु (२००८), मल्याळम (२०१३) आणि ओडिया (२०१४) या भाषांना अभिजात दर्जा बहाल केला गेला. हा दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अभिनंदन केलं आहे.