Narendra Modi Reaction on Donald Trump Victory US Election Result 2024 : जागतिक महासत्ता अमेरिकेच्या चाव्या आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात गेल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताबरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते चांगले मित्र आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केलं आहे.

“निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे मनापासून अभिनंदन. तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळात चांगली कामगिरी केलीत. भारत-अमेरिका व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी मी उत्सुक आहे. आपल्या लोकांच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करूया”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Balasaheb Thorat
Balasaheb Thorat : महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? बाळासाहेब थोरातांचं उत्तर, “आम्ही…”
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Donald Trump Home Hawan
US Election 2024 : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी भारतात होमहवन; दिल्लीत धर्मगुरूंनी केली प्रार्थना!
raj thackeray sada sarvankar Amit Thackeray
“सरवणकरांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती कधीच केली नाही”, मनसेचा चिमटा; म्हणाले, “त्यांचे दोन्ही पाय…”
ajit pawar bjp seat sharing assembly election
महायुतीत भाजपा मोठा भाऊ होतेय? अजित पवार प्रश्नावर म्हणाले, “आमचं सहमतीनं…”
maharashtra vidhan sabha election 2024 congress high command ignore rebels in gondia district constituency
Maharashtra Assembly Election 2024 : हायकमांड’कडून बंडखोरीची दखल नाहीच, गोंदिया जिल्ह्यातील चित्र
sharad pawar Dilip walse patil
Sharad Pawar : “…असं घडेल हे कधी वाटलं नव्हतं”, शरद पवारांची दिलीप वळसे-पाटलांवर टीका; म्हणाले, “सत्ता दिल्यावर त्यांनी…”
donald trump tagged trendulkar
Donald Trump: “भाई, मैं गोरेगाव में रहता हूँ”, मुंबईकराचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या मतदानाच्या आवाहनाला प्रतिसाद!

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक राज्यांमध्ये मुसंडी मारली आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांची समीकरणे बिघडवली. पेनसिल्वेनिया, जॉर्जिया ही महत्त्वाची मोक्याची राज्ये (स्विंग स्टेट्स) रिपब्लिकन पक्षाने डेमोक्रॅट्सकडून खेचून आणली. नॉर्थ कॅरोलिना या आणखी एका निर्णायक राज्यात ट्रम्प यांनी विजय मिळवला.

नरेंद्र मोदींनी केले डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन

हेही वाचा >> विश्लेषण: अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची अनपेक्षित मुसंडी कशी?

अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याचा केला उल्लेख

“आता आपण आपला देश कधीच नव्हता इतका उत्तम बनवणार आहोत. हे यश आपल्या सगळ्यांना एकत्र आणणार आहे. आपल्याला सर्व समस्या सोडवायच्या आहेत. आपण सगळे मिळून अमेरिकेला पुन्हा महान बनवू शकतो. त्यामुळे मला हे संगण्यात अतिशय आनंद होतोय की हे करणं ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. मी तुमचा अपेक्षाभंग करणार नाही. अमेरिकेचं भविष्य आणखी विशाल, आणखी चांगलं, आणखी श्रीमंत आणि आणखी सामर्थशाली असेल. देव तुम्हा सर्वांवर कृपा करो”, असं डोनाल्ड ट्रम्प आपल्या विजयी भाषणात म्हणाले.