Narendra Modi on Crime against Women : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (३१ ऑगस्ट) दिल्लीतल्या भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केलं. यावेळी मोदी यांनी देशभरातील महिलांविरोधातील अपराधांच्या प्रकरणांवर भाष्य केलं. अशा खटल्यांमध्ये पीडित महिलांना त्वरित न्याय मिळायला हवं, असं स्पष्ट मत मोदी यांनी मांडलं. महिलांविरोधातील अपराधांमध्ये जलदगतीने न्याय मिळायला हवा, असं म्हणत मोदी यांनी महिला सुरक्षेवरही त्यांचं मत मांडलं. ते म्हणाले, “महिलांविरोधात कुठेही एखादा अपराध झाला तर त्या प्रकरणांमध्ये महिलांना त्वरित न्याय मिळाला तर महिला सुरक्षेबाबत त्यांच्यातला आत्मविश्वास वाढेल. संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी न्यायपालिकेवर आहे. सर्वोच्च न्यायालय व भारतीय न्यायव्यवस्थेने आजवर ही जबाबदारी चोख पार पाडली आहे”.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा