Narendra Modi : आज नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण केलं. त्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. मोदी म्हणाले, “आपल्या देशाचं दुर्भाग्य बघा सरकारं कशी चालवली गेली आणि कुणसाठी चालवण्यात आली.” असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले तेव्हा तुमचं सरकार अदाणी चालवत आहेत अशा काही घोषणा विरोधी बाकांवरुन देण्यात आल्या. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना समज दिली. त्यावर मोदी चटकन म्हणाले जेव्हा जास्त ताप येतो तेव्हा काही लोक काहीही बडबडतात. मात्र जास्त निराशा आणि हताशपणा येतो तेव्हाही लोक बडबड करतात.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१० कोटी बनावट लोक विविध योजनांचा फायदा घेत होते-मोदी

मी आज हे सांगू इच्छितो की ज्यांचा जन्म झाला नव्हता असे १० कोटी बनावट लोक सरकारी खजिन्यातून विविध योजनांचा फायदा घेत होते. जे योग्य आहे ते झालं पाहिजे या धोरणातून आम्ही ही १० कोटी नावं हटवली आणि जे खरे लाभार्थी होते त्यांच्यापर्यंत मदत पोहचवण्याची मोहीम आम्ही चालवली. हे १० कोटी बनावट लोक जेव्हा बाजूला केले गेले तेव्हा कळलं की ३ लाख कोटी रुपये चुकीच्या हातांमध्ये जाण्यापासून वाचले. मी हात कुणाचा ते सांगत नाही, पण चुकीच्या हातांमध्ये पैसे गेले नाहीत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

आम्ही रद्दी विकून २३०० कोटींची भर सरकारी खजिन्यात घातली आहे-मोदी

जेएम पोर्टलद्वारे आम्ही खरेदी करु लागलो, व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणली ज्यामुळे सरकारचे १ लाख १५ हजार कोटी रुपये वाचले. आमच्या स्वच्छता अभियानाचीही यथेच्छ खिल्ली उडवण्यात आली. पण आज मी आनंदाने हे सांगू शकतो की स्वच्छ भारत अभियानामुळे सरकारी कार्यलायांमधली जी रद्दी विकण्यात आली त्यातून देशभरातून सरकारला २ हजार ३०० कोटी रुपये मिळाले आहेत अशी माहिती लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली. महात्मा गांधी म्हणायचे की आम्ही देशाचे विश्वस्त आहोत, त्याचप्रमाणे आम्ही काम करत आहोत. आता स्वच्छता अभियानातली रद्दी विकून आम्ही देशाच्या खजिन्यात २३०० कोटींची भर घातली आहे असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

१० वर्षांपूर्वीची परिस्थिती जरा आठवा, घोटाळेच घोटाळे होत होते-मोदी

मी आज बचतीचं महत्त्व देशाला सांगतो आहे, मात्र २०१४ च्या आधीची १० वर्षे आठवा. वृत्तपत्रात हेडलाइन यायच्या आज इतक्या लाख कोटींचा घोटाळा, आज इतके लाख कोटी कुठे गेले कळलं नाही. मागच्या दहा वर्षांत घोटाळा न झाल्याने जे लाखो करोडो रुपये वाचले आहेत ते देखील आम्ही जनतेच्या सेवेसाठीही वापरले आहेत. ज्या पैशांची बचत झाली त्यातून आम्ही लोक कल्याणाच्या योजना आणल्या. त्या पैशांचा उपयोग शीशमहल बनवण्यासाठी केला नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरविंद केजरीवाल यांनाही टोला लगावला.

पायाभूत सुविधांवर आम्ही प्रचंड भर दिला आहे-मोदी

मोदी आपल्या भाषणात पुढे म्हणाले, “पायाभूत सुविधांचं बजेट १० वर्षांपूर्वी म्हणजेच २०१४ च्या पूर्वी १ लाख ८० हजार कोटी होतं. आज ११ लाख कोटींचं बजेट आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी त्याचाही उल्लेख भाषणात केला. रस्ते, रेल्वे, ग्राम सडक योजना यांसह सगळ्या योजनांसाठी विकासाचा पाया रचला आहे. आम्ही बचत तर केलीच पण जनसामान्यांना बचतीचा लाभ मिळाला पाहिजे अशा योजना आम्ही आणल्या. आयुष्मान भारत योजना हा त्याचाच एक भाग आहे. आत्तापर्यंत देशातल्या लोकांचे १ लाख २० हजार कोटी वाचले आहेत याचं कारण ही योजना आहे. ” असंही मोदी यांनी म्हटलं आहे.