पीटीआय, हिरोशिमा
युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीकडे आपण मानवता आणि मानवी मूल्यांचा प्रश्न म्हणून पाहतो, राजकारण किंवा अर्थव्यवस्थेचा नव्हे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले. आंतरराष्ट्रीय कायद्यासह सर्व राष्ट्रांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता यांचा आदर राखण्याचे आवाहन त्यांनी केले.
हिरोशिमातील जी७ सत्रात केलेल्या भाषणात मोदी यांनी ‘जैसे थे’ परिस्थिती बदलण्याच्या एकतर्फी प्रयत्नांविरुद्ध सामूहिक आवाज उठवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. कुठलाही तणाव आणि वाद यावर संवादाच्या माध्यमातून शांततेने तोडगा काढला जायला हवा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी शनिवारी झालेल्या चर्चेचा संदर्भ देऊन, तेथील संघर्ष संपवण्यासाठी भारत शक्य ते सर्व करेल, याचा मोदी यांनी पुनरुच्चार केला.
युक्रेनच्या आक्रमणापासून स्वत:चे संरक्षण करण्याच्या युक्रेनच्या प्रयत्नांमध्ये जागतिक पाठिंब्याचे आवाहन झेलेन्स्की यांनी जी७च्या नेत्यांना केल्यानंतर मोदी यांनी हे वक्तव्य केले. युक्रेनमधील युद्ध हा या परिषदेचा केंद्रिबदू राहिलेला आहे.आधुनिक युगात अशी कुठलीही समस्या नाही, जिचा उपाय भगवान बुद्धांच्या शिकवणीत आढळत नाही, असे पंतप्रधानांनी सांगितले.‘संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव मार्ग असल्याचे आम्ही सुरुवातीपासूनच सांगितले आहे. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी जे काय शक्य असेल ते आम्ही करू,’ असेही मोदी म्हणाले.