वटहुकुमाच्या प्रकरणावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधानांचा अपमान केला आहे. त्यामुळे देश नक्की लोकशाहीच्या मुल्यांवर चालतोय, की युवराजांच्या इच्छेवर हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे म्हणत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर शरसंधान केले.
मोदी म्हणाले, आपल्या देशात सुरू असलेली घराणेशाही भारतीय संविधानाचा अपमान करत आहे. काँग्रेसची गांधीशाही आता फक्त नोटांवर टीकून राहील इतकेच प्रयत्न काँग्रेसमार्फत केले जात आहेत. कारण, पैशाशिवाय दुसरे काही काँग्रेसला दिसत नाही. काँग्रेसचे मुख्यमंत्री फक्त उद्घाटनाच्या फित कापण्याशिवाय इतर कोणतेही काम करत नाहीत” अशी टीका मोदींनी दिल्लीतील जाहीर सभेत केली. 
संबंधित बातम्या-
 पंतप्रधान ‘सरदार’ आहेत, पण ‘असरदार’ नाहीत; नरेंद्र मोदींची दिल्लीत गर्जना
समित्या स्थापन आणि बरखास्त करण्यात केंद्र शासन वाकबगार
राहुल गांधींच्या दौऱ्यानंतरही काँग्रेसची मरगळ कायम