पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री ते फ्रान्सची राजधानी पॅरीसला पोहचले. तिथे त्यांचं जोरदार स्वागत झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी AI समिटमध्ये भाषण केलं. तसंच द्वीपक्षीय चर्चाही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मार्सिलो या ऐतिहासिक शहराचाही दौरा करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

AI समिटला संबोधित करताना मोदी म्हणाले, “आज AI ही काळाची गरज आहे. आमच्याकडे जगातलं सर्वात मोठं टॅलेंट आहे. आम्ही लोकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्था तयार केली आहे. आमचं सरकार खासगी सेक्टर्सच्या मदतीने पुढे वाटचाल करतं आहे. AI चं भविष्य खूपच चांगलं आहे आणि AI मुळे सगळ्यांचं हित होणार आहे.”

AI कोड फॉर ह्युमॅनिटी लिहितो आहे-मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणांत पुढे म्हणाले, AI कोड फॉर ह्युमॅनिटी लिहितो आहे. AI मुळे लाखो आयुष्यं बदलणार आहेत. काळ बदलतो आहे त्याचप्रमाणे रोजगारांचं स्वरुपही बदलतं आहे. कायमच चर्चा होतात की AI मुळे रोजगाराचं संकट निर्माण होऊ शकतं. पण इतिहास आपल्याला हेच सांगतो की कुठलंही तंत्रज्ञान नोकऱ्या घेत नाही. AI मुळे नोकरीच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

AI बाबत सखोल चर्चा होणं आवश्यक-मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, AI आपल्या समाज, अर्थव्यवस्था आणि सुरक्षा या आघाड्यांना सकारात्मक पद्धतीने बदलतो आहे. AI बाबत काही जोखमीचे मुद्दे आहेत. त्यावर विचारमंथन झालं पाहिजे आणि चर्चा केला पाहिजे असंही मोदींनी सुचवलं आहे.

AI च्या पॅरीसमधल्या परिषदेत १०० देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की AI मध्ये हजारो आयुष्यं बदलण्याची ताकद आहे. समाज आणि सुरक्षा या दोन घटकांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आवश्यकता आहे, असं मोदी म्हणाले. त्याचप्रमाणे इमॅन्युअल मॅक्रो यांचे त्यांनी आभारही मानले. AI चा विकास हा वेगाने होतो आहे. डेटा गोपनीयता हा त्यातला एक महत्त्वाचा घटक आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.