भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा करिष्मा देशभरात होणा-या त्यांच्या सभांमधील गर्दीतून दिसून येत असतानाच सोशल नेटवर्कींग साईटमध्ये सर्वात लोकप्रिय असणा-या फेसबुकवरही मोदी नंबर ठरले आहेत. सोमवारी फेसबुकने प्रसिध्द केलेल्या २०१३ सालच्या अहवालात नरेंद्र मोदी यांनी मास्टरब्लास्टर ‘सचिन तेंडुलकर’ आणि ‘आयफओन ५एस’लाही मागे टाकत सर्वाधिक चर्चित व्यक्ती म्हणून पहिला येण्याचा मान मिळवल्याचं समोर आलं आहे.
फेसबुकने प्रसिध्द केलेल्या भारताच्या सर्वाधिक लोकप्रिय विषयांच्या यादीमध्ये रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन आणि भारताच्या मंगळयानाचाही समावेश आहे.     
जागतिक क्रमवारीत पोप फ्रान्सिस हे पहिल्या स्थानावर असून, त्याखालोखाल निवडणुका आणि रॉयल बेबी यांचा क्रमांक आहे. नुकतेच निधन पावलेले नेल्सन मंडेला या यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत.
फेसबुकने जारी केलेल्या भारतात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या ठिकाणांमध्ये हरियाणामधील मुरताल येथील अमरिक सुखदेव ढाबा याने सर्वात वरचा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे या ढाब्याने अमृतसर येथील सुवर्णमंदिर, दिल्लीतील कनॉट प्लेस आणि जगप्रसिध्द ताज महाललाही मागे टाकलं आहे.    
फेसबुकवरील कोणत्या लाईफ इव्हेन्ट्स आणि जागांनी सर्वात जास्त कमेंट्स, लाईक्स आणि शेअर मिळवल्या याच्या आधारावर देश आणि जागतिक पातळीवरील क्रमवारी ठरवली असल्याचं, फेसबुक डाटा एडिटर रॉबर्ट डिओनफ्रिओ म्हणाले.

Story img Loader