गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी कामगिरी सोपविण्यास विरोध दर्शविणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानाबाहेर मोदी यांच्या समर्थकांनी जोरदार निदर्शने केली.
‘नरेंद्र मोदीज आर्मी’ अशा आशयाचे फलक घेतलेल्या मोदी यांच्या समर्थकांनी शनिवारी दुपारी अडवाणी यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. नरेंद्र मोदी झिंदाबाद आणि ‘ब्रिंग नरेंद्र मोदी अॅज प्राइम मिनिस्टर’ अशा आशयाचे फलकही निदर्शकांच्या हातात होते. अडवाणी यांनी बाजूला व्हावे आणि मोदी यांना मोठी भूमिका वठविण्याची संधी द्यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. अडवाणी यांनी बाजूला व्हावे आणि मोदी यांना एक पाऊल पुढे टाकण्याची मुभा द्यावी, यासाठी आम्ही येथे आलो असल्याचे निदर्शकांचे म्हणणे होते. गोव्यातील अधिवेशनात अडवाणी यांनी मोदी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर करावयास हवे, मात्र अडवाणी तसे करणार नाहीत, असे एक निदर्शक म्हणाला.सध्या बहुतेक सर्वच पक्षांत नेतृत्वबदल होत असल्याने मोदी यांना संधी देण्याची हीच वेळ आहे, असे मत कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा