मंगळयान मोहिमेतील सर्व शास्त्रज्ञांचे आणि त्यांच्या सहायकांचे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अभिनंदन केले. भारताच्या महत्त्वाकांक्षी मंगळयानाने मंगळवारी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपक तळावरून प्रक्षेपण केले. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. 
ते म्हणाले, इस्रोतील शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांमुळे अंतराळाच्या क्षेत्रातही भारताचे स्थान जगामध्ये उंचीवर आहे. चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर मी स्वतः भेट घेऊन इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले होते. यावेळी प्रत्यक्ष भेट घेता आलेली नसली, तरी सर्व शास्त्रज्ञांचे मी अभिनंदन करतो. पृथ्वी आणि मंगळाचे नाते पुढील काळात मानवासाठी कल्याणकारी ठरेल. येणाऱया दिवसांमध्ये भारतातही मंगलमय बदल होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader