भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी हुंकार रॅलीत केलेल्या टीकेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनीही मोदींसोबत शाब्दीक युद्धाला वाचा फोडली आहे.
नरेंद्र मोदींनी आता बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले. इतके दिवस ते याबद्दल काहीच बोलले नव्हते. मोदींनी दिलेले आश्वासन म्हणजे फक्त मते झोळीत पाडण्यासाठी केलेला फुकटचा कावा असल्याचे नितीशकुमार म्हणाले आहेत.
मोदी सध्याच्या बिहारचे रुप पालटून नवे बिहार करण्याचे आश्वासन देतात, पण कोणतेही ज्ञान आणि बिहारबद्दल प्रेम नसून मोदी अशी आश्वासने कशी पूर्ण करणार आहेत हा मला पडलेला प्रश्न असल्याचेही नितीश कुमार म्हणाले.
नरेंद्र मोदींनी बिहारमधील पुर्णिया येथील सभेत केंद्रात भाजपची सत्ता आल्यास आम्ही बिहारला विशेष राज्याचा दर्जा, विशेष निधी आणि विकासाच्या दृष्टीने विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले होते. यावर नितीश कुमार यांनी सोशल नेटवर्कींक साईट फेसबुकवर मोदी केवळ मते बळकावण्याच्या दृष्टीने खोटी आश्वासने देत असल्याचे म्हटले आहे.
केवळ मते झोळीत पाडण्यासाठी मोदींना बिहार प्रेम- नितीश कुमार
नरेंद्र मोदींनी आता बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले. इतके दिवस ते याबद्दल काहीच बोलले नव्हते. मोदींनी दिलेले आश्वासन म्हणजे फक्त मते झोळीत पाडण्यासाठी केलेला फुकटचा कावा असल्याचे नितीशकुमार म्हणाले आहेत.
First published on: 11-03-2014 at 05:41 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modis new found love for bihar a ploy to win votes nitish kumar