व्हॉर्टेन बिझनेस स्कूलने आयोजित केलेल्या परिसंवादासाठी नरेंद्र मोदी यांना दिलेले निमंत्रण रद्द करण्याचा आयोजकांच्या निर्णयावर अमेरिकेतील कॉंग्रेसच्या एका सदस्याने कडाडून टीका केली. काही लोकांनी विरोध केला म्हणून एखाद्याचा आवाज दाबून टाकणे कदापि योग्य नसल्याचे अमेरिकी कॉंग्रेसचे सदस्य एनी फेलोमावेगा यांनी एका निवदेनात म्हटले आहे.
मोदी यांना निमंत्रित करताना व्हॉर्टेनच्या संचालकांना त्यांच्या इतिहासाबद्दल माहिती होती. गुजरातमधील त्या घटनेला घडून दहा वर्षे ओलांडल्यानंतर त्यांचे विरोधक करीत असलेल्या आरोपांबाबत भारतातील सर्वोच्च न्यायालयाला मोदी यांच्याविरुद्ध सबळ पुरावे मिळालेले नाहीत, याकडे एनी यांनी लक्ष वेधले.
पेन्सिल्वानिया विद्यापीठातील काही प्राध्यापकांच्या गटाने विरोध केला म्हणून मोदी यांना दिलेले निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय दुर्दैवी होता. वेगळा विचार मांडणाऱयांचा हक्क हिरावून घेऊन स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजणे गैर असल्याचे मत एनी यांनी व्यक्त केले. एनी हे अमेरिकी कॉंग्रेसच्या परराष्ट्र संबंध समितीचे सदस्य आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा