आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रचारसमितीचे प्रमुख नरेंद्र मोदी यांनी आता प्रादेशिक भाषांमधील ट्विटर अकाऊंट सुरू केले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींचे ट्विटस आता प्रादेशिक भाषांमध्येही वाचता येणार आहेत.
ऊर्दू, हिंदी, मराठी, कन्नड, मल्याळम, ओरिया, तमीळ आणि बंगाली भाषेमधून नरेंद्र मोदी आपले विचार आणि मते नेटिझन्सपर्यंत पोहोचविणार आहेत. प्रादेशिक भाषेमधून संवाद साधण्याच्या त्यांच्या तंत्राला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आतापर्यंत त्यांनी ऊर्दू भाषेमधून नऊ ट्विट केले. १५२ लोकांनी त्यांच्या ऊर्दू भाषेतील ट्विट्सला फॉलो केले. मराठीतील ट्विट्सला ४५५ लोकं फॉलो करताहेत. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील नेटिझन्सपर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न मोदी करत आहेत.