जयपूर : राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावणाऱ्या अपक्ष उमेदवार नरेश मीणा याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. थप्पड प्रकरणानंतर मीणा समर्थक आणि प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दरम्यान, मीणा यांच्या अटकेनंतर मतदारसंघातील सामरावता गावात उसळलेल्या हिंसाचारात पोलिसांच्या वाहनांसह सुमारे ६० दुचाकी आणि १८ चारचाकी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली.

देवळी-उनियारा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मतदानादरम्यान बुधवारी दुपारी नरेश मीणा यांनी मालपुराचे उपविभागीय दंडाधिकारी अमित चौधरी यांची कॉलर पकडत त्यांच्या कानशीलात लगावली होती. थप्पड प्रकरणानंतर सुरू झालेला तणाव बुधवारी रात्रभर आणि गुरुवारपर्यंत कायम होता. मीणा यांच्या अटकेसाठी ‘आरएएस असोसिएश’न आणि संबंधित सेवा अधिकाऱ्यांनी संप पुकारला. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याबरोबर बैठक होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे राज्यातील सरकारी कार्यालयांतील कामकाजाला याचा मोठा फटका बसला.

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Eknath Shinde On Heena Gavit :
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा हिना गावितांना अप्रत्यक्ष इशारा; म्हणाले, “बंडखोरी…”
violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
Malvan Shivputla accident case Hearing on bail plea of ​​Jaideep Apte Chetan Patil in High Court Mumbai news
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ

हेही वाचा >>> ‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत

मीणा यांच्या अटकेनंतर संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. परंतु यावेळी काहींनी पोलिसांवर दगडफेकही केली. गुरुवारी पहाटे झालेल्या हिंसाचारानंतर सुमारे ६० जणांना पोलिसांनी अटक केली. परंतु यानंतरही तणाव कायम होता. परंतु पोलिसांनी बंदोबस्तात वाढ करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

अटकेनंतर समर्थक आक्रमक

● नरेश मीणा यांना अटक करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने पूर्ण ताकदीनिशी बंदोबस्त तैनात करून ‘फ्लॅग मार्च’ काढला. टोंकचे पोलीस अधीक्षक विकास सांगवान यांनी पोलीस पथकाला गावात प्रवेश करून मीणा यांना ताब्यात घेण्याचे अंतिम निर्देश दिले. यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

● मीणा यांच्या अटकेनंतर समर्थक संतप्त झाले. या संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मीना यांच्या कथित समर्थकांनी रस्त्यांवर जाळपोळ सुरू केली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.

● नरेश मीणा यांच्यावर सार्वजनिक कामात अडथळा आणणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यासह चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक (अजमेर) ओम प्रकाश यांनी दिली.

काय आहे प्रकरण? ● मालपुराचे उपविभागीय दंडाधिकारी अमित चौधरी निवडणूक कर्तव्यावर होते. सामरावता या गावाचा देवळीऐवजी उनियारा उपविभागात समावेश करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. परंतु या गावातील नागरिकांनी मतदान करावे, यासाठी चौधरी प्रयत्न करत होते. परंतु नरेश मीणा गावकऱ्यांना साथ देत होते. यावेळी मीणा यांनी चौधरी यांच्या कानशीलात लगावली.