जयपूर : राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावणाऱ्या अपक्ष उमेदवार नरेश मीणा याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. थप्पड प्रकरणानंतर मीणा समर्थक आणि प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दरम्यान, मीणा यांच्या अटकेनंतर मतदारसंघातील सामरावता गावात उसळलेल्या हिंसाचारात पोलिसांच्या वाहनांसह सुमारे ६० दुचाकी आणि १८ चारचाकी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली.
देवळी-उनियारा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मतदानादरम्यान बुधवारी दुपारी नरेश मीणा यांनी मालपुराचे उपविभागीय दंडाधिकारी अमित चौधरी यांची कॉलर पकडत त्यांच्या कानशीलात लगावली होती. थप्पड प्रकरणानंतर सुरू झालेला तणाव बुधवारी रात्रभर आणि गुरुवारपर्यंत कायम होता. मीणा यांच्या अटकेसाठी ‘आरएएस असोसिएश’न आणि संबंधित सेवा अधिकाऱ्यांनी संप पुकारला. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याबरोबर बैठक होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे राज्यातील सरकारी कार्यालयांतील कामकाजाला याचा मोठा फटका बसला.
हेही वाचा >>> ‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत
मीणा यांच्या अटकेनंतर संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. परंतु यावेळी काहींनी पोलिसांवर दगडफेकही केली. गुरुवारी पहाटे झालेल्या हिंसाचारानंतर सुमारे ६० जणांना पोलिसांनी अटक केली. परंतु यानंतरही तणाव कायम होता. परंतु पोलिसांनी बंदोबस्तात वाढ करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
अटकेनंतर समर्थक आक्रमक
● नरेश मीणा यांना अटक करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने पूर्ण ताकदीनिशी बंदोबस्त तैनात करून ‘फ्लॅग मार्च’ काढला. टोंकचे पोलीस अधीक्षक विकास सांगवान यांनी पोलीस पथकाला गावात प्रवेश करून मीणा यांना ताब्यात घेण्याचे अंतिम निर्देश दिले. यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
● मीणा यांच्या अटकेनंतर समर्थक संतप्त झाले. या संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मीना यांच्या कथित समर्थकांनी रस्त्यांवर जाळपोळ सुरू केली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.
● नरेश मीणा यांच्यावर सार्वजनिक कामात अडथळा आणणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यासह चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक (अजमेर) ओम प्रकाश यांनी दिली.
काय आहे प्रकरण? ● मालपुराचे उपविभागीय दंडाधिकारी अमित चौधरी निवडणूक कर्तव्यावर होते. सामरावता या गावाचा देवळीऐवजी उनियारा उपविभागात समावेश करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. परंतु या गावातील नागरिकांनी मतदान करावे, यासाठी चौधरी प्रयत्न करत होते. परंतु नरेश मीणा गावकऱ्यांना साथ देत होते. यावेळी मीणा यांनी चौधरी यांच्या कानशीलात लगावली.