२००२ सालच्या नरोडा पाटिया दंगल प्रकरणात शिक्षा झालेला विश्व हिंदू परिषदेचा नेता बाबू बजरंगी याला गुजरात उच्च न्यायालयाने वैद्यकीय आधारावर तीन महिन्यांचा तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. बजरंगी याच्या डोळ्यांवर योग्य तो उपचार करण्यासाठी त्याला तीन महिन्यांसाठी सोडण्यात यावे, ही त्याच्या पत्नीची याचिका मान्य करून न्या. रवी त्रिपाठी व न्या. आर. डी. कोठारी यांच्या खंडपीठाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला.

Story img Loader