मध्य प्रदेशातील छतरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने रामकथेचं पारायण ठेवलं होतं. परंतु हा कथावाचनाचा कार्यक्रम यजमानाला महागात पडला आहे. कारण कथावाचनासाठी आलेल्या कथावाचकाच्या शिष्याने यजमानाच्या पत्नीला पळवून नेलं आहे. पीडित पतीने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी एक महिनाभर शोधाशोध केल्यानंतर तक्रारदाराची पत्नी सापडली. त्यानंतर पोलिसांनी महिलेला पोलीस ठाण्यात बोलावलं. तिथे पोलिसांसमोर महिलेने तिच्या पतीसोबत राहण्यास नकार दिला. महिलेने चित्रकूट धामचे धीरेंद्र आचार्य यांचा शिष्य नरोत्तम दुबे याच्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली.

खरंतर या प्रकरणाची सुरुवात २०२१ मध्ये झाली होती. महिलेचे पती राहुल तिवारी यांनी जवळच्या गौरशंकर मंदिरात रामकथेचं आयोजन केलं होतं. कथावाचनासाठी चित्रकूटचे कथावाचक धीरेंद्र आचार्य यांना बोलावण्यात आलं. आचार्य त्यांचा शिष्य नरोत्तम दुबे आणि इतर शिष्यांसह धीरेंद्र आचार्य तिथे आले होते.

यादरम्यान, नरोत्तम दुबे याने आपल्या पत्नीला प्रेमजालात अडकवलं असा आरोप राहुल तिवारी यांनी केला आहे. या कथावाचनाच्या कार्यक्रमादरम्यान दुबे आणि तिवारी यांची पत्नी दोघांनी एकमेकांचे फोन नंबर शेअर केले. त्यानंतर गेल्या महिन्यात ५ एप्रिल रोजी नरोत्तम दुबे हा तिवारी यांच्या पत्नीला पळवून घेऊन गेला.

हे ही वाचा >> Wrestlers Protest : पैलवान पुनियाची बजरंग दलाबाबत पोस्ट, टीकेनंतर काही मिनिटात केली डिलीट; नेमकं प्रकरण काय?

याप्रकरणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमित सांघी म्हणाले, पती-पत्नीमधील भांडणांमुळे पत्नीला तिच्या पतीसोबत राहायचं नाही. तिला दुबे याच्यासोबत राहायचं आहे. त्यामुळे याप्रकरणी कोणत्याही गुन्ह्याची नोंद करता येत नाही तसेच कारवाई करता येत नाही. तरी पोलीस तिवारी यांच्या तक्रारीनुसार तपास करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narottamdas dubey dhirendra acharya disciple ran away with hosts wife chhatarpur mp asc
Show comments