NASA Space X Crew-9 Return Highlights : भारतीय वंशाची आणि नासामधील वरिष्ठ अंतराळवीर सुनीता विल्यम्स अखेर ९ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पृथ्वीतलावर उतरली आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ नासाचे हे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर दोन्ही अंतराळवीर सुरक्षितपणे खाली उतरले. सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे स्पेसएक्स कॅप्सूल आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनहून निघाल्यानंतर काही तासांतच बुधवारी सकाळी गल्फ ऑफ मेक्सिको येथे उतरले. फ्लोरिडातील तल्लाहसीच्या किनाऱ्याजवळ हे कॅप्सूल उतरले. जगभरातून अनेकांच्या नजरा या अंतराळवीरांच्या परतीच्या प्रवासाकडे लागल्या होत्या. आठ दिवसांची मोहिम तब्बल ९ महिने लांबल्याने त्यांच्या परतीकडे अवघ्या जगाचं लक्ष लागून होतं. अखेर त्या परतल्या असून जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Live Updates

Sunita Williams Breaking News Live Today : सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुखरुप परतल्याने जगभर जल्लोषाचे वातावरण

13:23 (IST) 19 Mar 2025

Sunita Williams Return Updates : सुनीता विल्यम्सने अंतराळातही नेली होती गणपती बाप्पाची मूर्ती, महाकुंभमेळ्याचेही होते आकर्षण! भारतात येण्याविषयी बहिणीने दिली माहिती

अमेरिकास्थित असलेल्या सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या आहेत. त्यांचे वडील भारतातील गुजरातचे असून ते कामानिमित्त अमेरिकेत स्थायिक झाले होते. असं असलं तरीही सुनीता विल्यम्स या त्यांच्या भारतातील नातेवाईकांच्या सतत संपर्कात असतात. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातूनही (Internation Space Station) त्या भारतातील त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात होत्या. याचविषयी त्यांची चुलत बहीण फाल्गुनी पांड्या यांनी सांगितलं. सविस्तर वृत्त वाचा

13:18 (IST) 19 Mar 2025

Astronaut Daily Calorie Intake: अंतराळवीरांना अंतराळात उत्साही अन् तंदुरुस्त राहण्यासाठी किती कॅलरीज आवश्यक असतात?

साच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे दोघे नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज (१९ मार्च) पृथ्वीवर परतले आहेत. अंतराळामध्ये असताना गुरुत्वकर्षामुळे अंतराळवीरांच्या शरीरावर कसा परिणाम होतो आणि अंतराळामध्ये तंदरुस्त राहण्याते ते काय करतात याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

सविस्तर बातमी येथे वाचा

13:04 (IST) 19 Mar 2025

Sunita Williams Space Health Impact : अखेर पृथ्वीवर परतल्या सुनिता विल्यम्स! नऊ महिने अंतराळात राहिल्यास शरीरावर काय परिणाम होतो?

नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे दोघे नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज (१९ मार्च) पृथ्वीवर परतले आहेत. जेव्हा अंतराळवीर एका महिन्यापेक्षा जास्त काळ अंतराळात राहतात तेव्हा त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतो? याबाबत डॉक्टर काय सांगतात जाणून घ्या

सविस्तर लिंक येथे वाचा

11:46 (IST) 19 Mar 2025

सुनीता विल्यम्स यांच्या ग्रहवापसीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास प्रतिक्रिया, म्हणाले...

https://twitter.com/narendramodi/status/1902235311071023195?s=48

11:41 (IST) 19 Mar 2025

सुनीता विल्यम्स यांना नासाच्या पथकाने स्ट्रेचरवरून का नेलं? दोन्ही अंतराळवीरांची प्रकृती आता कशी आहे?

नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे दोघे नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज (१९ मार्च) पृथ्वीवर परतले आहेत. अवघ्या ८ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station वर गेलेले विल्यम्स व विल्मोर हे तांत्रिक अडचणींमुळे तिथेच अडकले होते. तब्बल २८६ दिवसांनंतर ते पृथ्वीवर परतले आहेत. नऊ महिने पृथ्वीच्या गुरुत्त्वाकर्षणापासून दूर राहिल्यामुळे त्या काही दिवस पृथ्वीवर आधाराशिवाय उभ्या देखील राहू शकणार नाहीत. त्यामुळे अवकाश यानातून त्यांना बाहेर काढल्यानंतर स्ट्रेचरवरून प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आलं.

सविस्तर वाचा

11:23 (IST) 19 Mar 2025

Sunita Williams : ६२ तास ९ मिनिटे स्पेस वॉक, १५० प्रयोग अन्…; सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात नऊ महिने काय काय केले?, नासाने सर्व सांगितले

अखेर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर मंगळवारी फ्लोरिडा पॅनहँडलजवळ मेक्सिकोच्या आखातात उतरून पृथ्वीवर परतले. यावेळी त्यांना पहिल्यांदा गुरुत्वाकर्षण जाणवले. दरम्यान सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सुमारे नऊ महिने राहिले, त्या काळात त्यांनी तिथे काय केले?, याबाबत नासाने माहिती दिली आहे.

11:11 (IST) 19 Mar 2025
"स्वागतम!", आनंद महिंद्रांनी शेअर केली सुनीता विल्यम्स यांच्याबरोबरची दोन वर्षांपूर्वीची आठवण!

जेव्हा स्पेसएक्स रेस्क्यू मिशन सुरू झाले तेव्हा मला दोन वर्षांपूर्वी वॉशिंग्टनमध्ये सुनीता विल्यम्ससोबत झालेल्या या भेटीची आठवण झाली. काही तासांपूर्वी तिला आणि तिच्या सहकाऱ्यांना पृथ्वीवर यशस्वीरित्या परतताना पाहून खूप दिलासा मिळाला. ती धैर्याची मूर्ती आहे आणि ती आपल्यामध्ये परत आल्याने आनंद झाला. स्वागतम, सुनीता." - आनंद महिंद्रा

https://twitter.com/anandmahindra/status/1902191219129905183

09:50 (IST) 19 Mar 2025

Sunita Williams Return : सुनीता विल्यम्सच्या कौशल्याचा भारत वापर करणार, इस्रोकडूनही कौतुकोद्गार!

आयएसएसवरील दीर्घ मोहिमेनंतर तुमचे सुरक्षित पुनरागमन ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. हा प्रवास नासा, स्पेसएक्स आणि अमेरिकेच्या अंतराळ संशोधनातील वचनबद्धतेचा पुरावा आहे. तुमची सामर्थ्य आणि समर्पण जगभरातील अंतराळ उत्साही लोकांना प्रेरणा देत आहे. सचिव संरक्षण आणि इस्रोचे अध्यक्ष या नात्याने, मी माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्हाला पुढील दिवसाच्या शुभेच्छा देतो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत एक विकसित देश बनवण्याच्या दिशेने काम करत असताना, आम्ही अंतराळ संशोधनातील तुमच्या कौशल्याचा वापर करू इच्छितो - ISRO

09:34 (IST) 19 Mar 2025

Sunita Williams Return Updates : “मुस्कुराने की वजह तुम हो!” सुनीता विल्यम्सच्या ‘ग्रह’वापसीवर सोशल मीडियावर कौतुक सोहळा

भारतीय वेळेनुसार, पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ सुनीता विल्यम्स उतरल्या अन् जगभर जल्लोष सुरू झाला आहे. सुनीता विल्यम्स यांचे वडील भारतीय असल्याने भारतीयांनीही त्यांच्या घरवापसीचा आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

सविस्तर वृत्त वाचा

09:32 (IST) 19 Mar 2025
९ महिन्यांनी सुनीता विल्यम्स परतल्या, भारताकडून पहिली प्रतिक्रिया; संरक्षण मंत्री म्हणाले, "भारताची कन्या..."

नासाच्या क्रू9 यान पृथ्वीवर सुरक्षित परतल्याने आनंद झाला! भारताची कन्या सुनीता विल्यम्स आणि इतर अंतराळवीरांचा समावेश असलेल्या पथकाने अंतराळात मानवी सहनशक्ती आणि चिकाटीचा इतिहास पुन्हा लिहिला आहे.

सुनीता विल्यम्सचा अविश्वसनीय प्रवास, अढळ समर्पण, धैर्य आणि लढाऊ वृत्ती जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देईल. तिचे सुरक्षित परतणे हा अंतराळ उत्साही आणि संपूर्ण जगासाठी उत्सवाचा क्षण आहे. तिचे धाडस आणि कामगिरी आपल्या सर्वांना अभिमानास्पद आहे.

त्यांना पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि खूप खूप आभार.

-राजनाथ सिंह, केंद्रीय संरक्षण मंत्री

https://twitter.com/rajnathsingh/status/1902180107416170733

08:40 (IST) 19 Mar 2025

Sunita Williams Salary : नऊ महिने अंतराळात घालवणाऱ्या सुनीता विल्यम्स यांना NASA किती पैसे देणार? निवृत्त अंतराळवीराने दिली माहिती

नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे जेमतेम आठ दिवसांसाठी बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेसाठी, आंतरराष्ट्रीय आंतराळ केंद्र म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये (ISS) येथे गेले होते. परंतु, त्यांना अंतराळात जाऊन आता नऊ महिने उलटून गेले तरी ते अद्याप पृथ्वीवर परत आलेले नहीत. काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांना तिथेच थांबावं लागले आहे. दरम्यान सध्या विल्यम्स व विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्याचे प्रयत्न चालू असून पुढच्या आठवड्यात दोघेही पृथ्वीवर परततील. १९ मार्च पूर्वी स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानातून परत येण्याच्या तयारीत असतानाच दुसरीकडे ते परत आल्यानंतर त्यांना अंतराळात राहण्यासाठी किती पैसे मिळणार याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सविस्तर वृत्त वाचा

08:39 (IST) 19 Mar 2025

ट्रम्प यांच्याकडून अंतराळवीरांचं स्वागत, एलॉन मस्क यांचे मानले आभार

मंगळवारी (स्थानिक वेळेनुसार) व्हाईट हाऊसने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अडकलेल्या नासा क्रू-९ अंतराळवीर सुनीता विल्यम्स, निक हेग, बुच विल्मोर आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांच्या परतीला कसे प्राधान्य दिले यावर प्रकाश टाकला.

व्हाईट हाऊसने म्हटले आहे की अंतराळवीर अमेरिकेच्या आखातात सुरक्षितपणे परतले आहेत, त्यांच्या सुरक्षित परतीचे श्रेय एलॉन मस्क यांना दिले आहे.

"वचन दिले, वचन पूर्ण केले : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नऊ महिने अंतराळात अडकलेल्या अंतराळवीरांना वाचवण्याचे वचन दिले. आज, ते अमेरिकेच्या आखातात सुरक्षितपणे खाली उतरले. एलॉन मस्क, स्पेसएक्स आणि नासाचे आभार!" व्हाईट हाऊसने X वर पोस्ट केले.

https://twitter.com/WhiteHouse/status/1902124106843132309

08:36 (IST) 19 Mar 2025

चंद्रावर गेलेले नासाचे अंतराळवीर बझ अल्ड्रिन यांनी केलं दोन्ही अंतराळवीरांचं अभिनंदन

चंद्रावर गेलेले नासाचे अंतराळवीर बझ अल्ड्रिन यांनी X वर पोस्ट केले, " विस्तारित मोहिमेनंतर नासाचे अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनी विल्यम्स यांना परत आणल्याबद्दल @SpaceX चे अभिनंदन! गेल्या काही महिन्यांपासून या अंतराळवीरांचं स्थिर संतुलन आणि व्यावसायिकता कौतुकास्पद आहे. तुम्ही घरी आल्याने आम्हाला आनंद झाला!"

08:33 (IST) 19 Mar 2025

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांच्या भारतातील भावाने दिली प्रतिक्रिया, म्हणाले, “रामाची उपासना करणारी…”

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) ची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नऊ महिने राहिल्यानंतर घरी परतणार आहेत. या परतीचा सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. आठ दिवसांची मोहिम तब्बल ९ महिने लांबल्याने सर्वांचंच या परतीकडे लक्ष होतं. अखेर त्या मध्यरात्री पृथ्वीतलावर उतरणार असून त्यांच्या परतीचा आनंद त्यांच्या भारतातील नातेवाईकांनीही व्यक्त केला आहे. गुजरातस्थित चुलत भाऊ दिनेश रावल यांनी सुनीता विल्यम्स यांच्या भावाने अभिमान वाटत असल्याचं म्हटलंय.

सविस्तर वृत्त वाचा

08:32 (IST) 19 Mar 2025

Sunita Williams Return Updates: सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या, पण शारिरीक नुकसानाचं काय? ४५ दिवसांच्या रिहॅबिलिटेशनमध्ये राहावं लागणार!

नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बुच विलमोर हे अखेर पृथ्वीवर परतले आहेत. अवघ्या ८ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station वर गेलेल्या सुनीता विल्यम्स व बुच विलमोर हे तांत्रिक अडचणींमुळे तिथेच अडकले. तब्बल २८६ दिवसांनंतर ते पृथ्वीवर परतले आहेत. पण असं असलं, तरी या काळात संपूर्णपणे वेगळ्या वातावरणात राहिल्यामुळे त्यांच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी त्यांना ४५ दिवसांच्या ‘अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम’मध्ये राहावं लागणार आहे!

सविस्तर वृत्त वाचा

08:32 (IST) 19 Mar 2025

Sunita Williams Returns to Earth Video : अखेर प्रतीक्षा संपली! सुनीता विल्यम्स अंतराळातून पृथ्वीवर उतरल्या; NASAने शेअर केला खास क्षणाचा Video

तब्बल नऊ महिने अंतराळात अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अखेर पृथ्वीवर परत आले आहेत. भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ नासाचे हे दोन्ही अंतराळवीर सुरक्षितपणे खाली उतरले. याबरोबरच मुळात आठ दिवसांसाठी नियोजित असणारी ही मोहिम नऊ महिन्यानंतर संपुष्टात आली आहे. दरम्यान नासाने अंतराळवीर जमीनीवर उतरले त्या क्षणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

सविस्तर वृत्त वाचा

08:30 (IST) 19 Mar 2025

Sunita Williams Return Live Updates : "मला तिची खूप आठवण आली"; सुनीता विल्यम्स यांच्या आईने दिली प्रतिक्रिया

मला तिची खूप आठवण आली ९ महिन्यात. तिने लवकरात लवकर घरी परतावं अशी आमची अपेक्षा होती - सुनीता विल्यम्स यांची आई

Sunita williams

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर. (Photo: PTI)

Sunita Williams Breaking News Live Today : सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुखरुप परतल्याने जगभर जल्लोषाचे वातावरण

Story img Loader